रायपूर - जन्माष्टमीनंतर १५ दिवसांनी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला राधाअष्टमी साजरी केली Radha Ashtami 2022 जाते. राधा अष्टमीच्या दिवशी राधाचा जन्म झाला. या दिवशी राधा आणि कृष्णाची पूजा केली जाते. राधाला भगवान श्रीकृष्णाची मैत्रीण म्हणून ओळखले जाते. कमळाच्या फुलातून त्यांचा अवतार झाला. राधाअष्टमीच्या दिवशी भाविक बरसाणाच्या उंच टेकडीवर असलेल्या मंदीराची प्रदक्षिणा करतात. राधाअष्टमी प्रामुख्याने उत्तर प्रदेशात साजरी केली जाते. या दिवशी राधा आणि भगवान कृष्णाच्या मूर्तीना किंवा त्यांच्या विविध रूपांची फुलांनी सजावट केली idol Radha Krishna Decorate with flowers जाते. राधाअष्टमीच्या दिवशी भाविकांना राधाच्या चरणांचे दर्शन घडते.
राधाअष्टमी साजरी केली जाते - परंपरेनुसार, गौडीय वैष्णव राधा आणि कृष्णाची विशेष पूजा Radha Krishna pooja करतात. या पंथाचे लोक भगवद्गीता आणि भागवत पठण करतात. काही लोक निर्जला व्रत पाळतात. याशिवाय काही लोक प्रथा आणि परंपरांनुसार अर्धा दिवस उपवास करतात. राधाअष्टमी प्रामुख्याने बरसाणा, मथुरा, वृंदावन, नांदगाव येथे साजरी केली जाते. राधाअष्टमीची तिथी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12.25 वाजल्यापासून सुरू होतो ते ती 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10.40 पर्यंत राहतो. त्यानुसार राधाअष्टमीचा उत्सव 4 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस साजरी होतो. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे साडजे पाच पर्यंत असतो.
राधाअष्टमीला अशी करा पूजा - सकाळी उठल्यावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश ठेवा. पूजेच्या ठिकाणी मातीचे भांडेही ठेवावे. पूजेसाठी चौक तयार करा. पाटावर लाल किंवा पिवळे कापड घालून राधा आणि कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करा. पंचामृत आणि गंगाजलाने स्नान करावे. सुंदर कपडे आणि दागिन्यांसह मूर्तीची सजावट करा. दोघांनाही तिलक लावून पुष्प अर्पण करावे. राधा आणि कृष्णाच्या मंत्राचा जप करतात. त्यानंतर कथेचे वाचण आणि राधा आणि कृष्णाची आरती Radha Krishna Aarti करतात.
हेही वाचा - Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांना भेट; लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन