ETV Bharat / bharat

Geetanjali Shree wins international booker prize : लेखिका गीतांजली श्री यांच्या हिंदीतील टॉम्ब ऑफ सँडला बुकर पारितोषिक - Hindi Writer Geetanjali shree

उत्तर प्रदेशात वाढलेल्या गीतांजली श्री यांचे ( Hindi Writer Geetanjali shree ) हिंदीवर प्रचंड प्रेम आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी 'शॉर्टलिस्ट' झाल्यावर 'टॉम्ब ऑफ सँड ' ( Tomb of Sand ) हे हिंदी भाषेतील पहिले पुस्तक ठरले आहे. आता त्याला 2022 चा बुकर पुरस्कारही मिळाला आहे. गीतांजली श्रींचे हे पुस्तक मूळ हिंदीत 'रेत समाधी' या नावाने प्रकाशित झाले आहे.

लेखिका गीतांजली श्री
लेखिका गीतांजली श्री
author img

By

Published : May 27, 2022, 3:47 PM IST

लखनौ - लेखिका गीतांजली श्री यांना 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'टॉम्ब ऑफ सँड' ( Tomb of Sand booker ) या कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित ( International Booker Prize for hindi book ) करण्यात आले आहे. मी बुकरचे स्वप्न पाहिले नव्हते, मी हे करू शकेन असे कधीच वाटले नव्हते. मला आनंद आणि सन्मान वाटत असल्याची प्रतिक्रिया लेखिका गीतांजली श्री ( Geetanjali Shree from Meghalay ) यांनी दिली आहे.

1957 मध्ये मैनपुरी येथे जन्मलेल्या गीतांजली श्री यांचे बालपण उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात गेले. येथे त्यांचे वडील सरकारी कर्मचारी म्हणून तैनात होते. त्यांचे शिक्षण स्थानिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये झाले. उत्तर प्रदेशात वाढलेल्या गीतांजली श्री यांचे ( Hindi Writer Geetanjali shree ) हिंदीवर प्रचंड प्रेम आहे.

2022 चा बुकर पुरस्कार मिळाला-आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी 'शॉर्टलिस्ट' झाल्यावर 'टॉम्ब ऑफ सँड ' ( Tomb of Sand ) हे हिंदी भाषेतील पहिले पुस्तक ठरले आहे. आता त्याला 2022 चा बुकर पुरस्कारही मिळाला आहे. गीतांजली श्रींचे हे पुस्तक मूळ हिंदीत 'रेत समाधी' या नावाने प्रकाशित झाले आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' हे डेझी रॉकवेल यांनी केले आहे. ज्युरी सदस्यांनी पुस्तकाला तेजस्वी म्हटले आहे.

माझ्यासाठी हा एक चांगला क्षण -बुकरसाठी 'टॉम्ब ऑफ सॅन्ड'ची निवड झाली तेव्हा गीतांजली श्री म्हणाल्या की, हा एक अतिशय खास प्रकारचा विश्वास आहे. जेव्हा काही काम दूरवर बसलेल्या अज्ञात लोकांना आकर्षित करते. हा खरा आधार आहे. काम चांगले असावे, भाषांतर उत्कृष्ट असावे. डेझी आणि माझ्यासाठी हा एक चांगला क्षण आहे. आता त्यांच्या कादंबरीला 2022 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.

टॉम्ब ऑफ सॅन्डची पाच कांदबऱ्यांशी होती स्पर्धा-50,000 पौंडचा पुरस्कार असलेल्या साहित्य पुरस्काराचा इतर पाच कादंबर्‍यांशी स्पर्धा होती. यामध्ये टॉम्ब ऑफ सॅन्डने पुरस्कार जिंकला. पुरस्काराची रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यात विभागणी केली जाईल. लंडन बुक फेअरमध्ये जाहीर केलेल्या इतर शॉर्टलिस्ट केलेल्या पुस्तकांमध्ये बोरा चुंग यांच्या शापित बनीचा समावेश आहे. अँटोन हर यांनी कोरियनमधून अनुवादित केला आहे. जॉन फॉसचे ए न्यू नेम: सेप्टोलॉजी VI-VII हे देखील शर्यतीत होते. त्यांचे नॉर्वेजियन भाषेतून डॅमियन सीअर्सने भाषांतर केले होते.

हेही वाचा-After Somaiya's allegations : सोमय्यांच्या आरोपानंतर अडकले आघाडीचे 'हे' नेते

हेही वाचा-Om Prakash chautala Jail : हरिणायाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा-Aryan Khan : आर्यन खानला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.