ETV Bharat / bharat

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाची प्रतीक्षा आणखी तीव्र; हवामान विभागाने दिला विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा - भारतीय हवामान विभाग

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दक्षिण राजस्थान, उत्तर गुजरात आणि लगतच्या भागात एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा आणखी तीव्र झाली आहे.

maharashtra weather forecast
महाराष्ट्र हवामान अंदाज
author img

By

Published : Jun 19, 2023, 9:19 AM IST

नवी दिल्ली : पावसाअभावी पूर्ण महाराष्ट्र राज्यातच सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. उत्तर भारतातील लोक कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील काही राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. तर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राजस्थानमधील बारमेरसह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणी साचून पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाची शक्यता : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय हळूहळू कमकुवत होत आहे. पूर्व-ईशान्य दिशेने सरकत आहे. दक्षिण राजस्थान, उत्तर गुजरात आणि लगतच्या भागात एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे फक्त गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा: आयएमडीने झारखंड आणि छत्तीसगडमधील काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली आहे. उष्ण वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांत कडक उन्हाचा तडाखा बसला आहे. झारखंडच्या सरकारने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्ट्या २१ जूनपर्यंत वाढवल्या आहेत. यासोबतच महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे आठवडाभरात 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढील 24 तासांचा अंदाज: हवामान माहिती वेबसाइट स्कायमेट वेदरनुसार, पुढील 24 तासांत दक्षिण, मध्य आणि पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशचा काही भाग, ईशान्य भारत, सिक्कीम, केरळचा काही भाग, रायलसीमा, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, दक्षिण छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग, पूर्व बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

उष्णतेची लाट : हरियाणा दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस, गडगडाट आणि धुळीचे वादळ असू शकते. पश्चिम हिमालय आणि पंजाबच्या उत्तर भागात विखुरलेला पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या स्थितीची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते.

आसाममध्ये पूर: आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे. नद्या धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहेत. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जोरहाट जिल्ह्यातील नेमतीघाट येथे ब्रह्मपुत्रा लाल चिन्हावरून वाहत आहे. कामपूर (नागाव) येथील कोपिली आणि कामरूप जिल्ह्यातील पुथिमारी नदीही धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. एका अहवालानुसार 30 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. आयएमडीच्या गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने एका विशेष बुलेटिनमध्ये कोक्राझार, चिरांग, बक्सा, बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांमध्ये रविवार आणि सोमवारसाठी 'मुसळधार' पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा :

  1. Rajasthan Flood Situation : बिपरजॉय चक्रीवादळाचा राजस्थानमध्ये कहर, अनेक भागात पूरसदृश परिस्थिती
  2. Cyclone Biparjoy Updates: गुजरातच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चक्रीवादळाचा वाढला धोका; सुरक्षेसाठी कांडला बंदरासह १९ रेल्वे बंद
  3. Maharashtra Weather Update: पुढील आठवडाभर राज्यातील विविध ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जन व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.