मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे दोघेही आज दिल्लीमध्ये असणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई ( Basavaraj Bommai ) हे देखील आज दिल्लीत असणार आहेत. ते देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
- महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे आज दिल्लीत असतील. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai ) हे देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे.
- महामोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक : 17 डिसेंबरला होणाऱ्या मोर्चा संदर्भात आज अजित पवारांच्या दालनात मविआच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.
- पुण्यात आजपासून सवाई गंधर्व महोत्सव सुरू : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायचा मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. पहिल्या दिवशीची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने मैफिल रंगणार आहे. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच : एकदिवसीय मालिकेत पराभवानंतर आता टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिल्या कसोटी सामना आज 14 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.