मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ( Governor Bhagat Singh Koshyari ) भाजप नेते चंद्रकांत पाटील,( Chandrakant Patil ) भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
- महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी घटनापीठासमोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्देशांसाठी हे प्रकरण आहे. आज सत्ता संघर्षाच्या प्रकरणात घटनापीठासमोर मुख्य युक्तिवादांची तारीख आज ठरण्याची शक्यता आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्ट ( Supreme Court ) काही आदेश देतं का याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचे प्रकरण क्रमांक 36 वर आहे.
- नवाब मलिकांच्या जामीनावर आज सुनावणी : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखल देत वकिलांकडून तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टाने सुनावणीची विनंती मान्य केली असून आज ही सुनावणी होईल.
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक : आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक सीमावादा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
- आज पुणे बंदची हाक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिली.
- आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात : मुंबईसह देशभराचे लक्षलागून राहिलेल्या जी- 20 परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील बिकेसी सेंटर येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे.
- तृतीयपंथीयांना ऑनलाइन साइटवर पर्याय उपलब्ध : आता तृतीयपंथीयांना देखील पोलिस आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरतील येईल. आजपासून म्हणजेच 13 डिसेंबरपासून ऑनलाइन साइटवर पर्याय उपलब्ध असणार आहे.
- बिल्कीस बानोच्या याचिकेवर सुनावणी : बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बिल्कीस बानो रेप केस प्रकरणी दोषी आरोपींची शिक्षा माफ करण्यात आली होती. याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होईल.
- जळगावात रास्ता रोको : महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्यांविरोधात शाहू, फुले आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको करण्यात येणार आहे.