ETV Bharat / bharat

Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे अपरिपक्व नेते' - BJP criticism of Uddhav Thackeray

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय ( Kailash Vijayvargiya statement ) यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्याबाबत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला ( BJP criticism of Uddhav Thackeray ) आहे. कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये अजून परिपक्वता यायची आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे भाजपमध्ये येण्याच्या अटकळीलाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 25, 2022, 7:56 PM IST

Updated : Oct 25, 2022, 8:16 PM IST

इंदौर : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर आता शिवसेनेकडून एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) सरकारविरोधात जोरदार भाषणबाजी सुरू ( maharashtra politics ) आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. त्याचवेळी शिंदे यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भाजपच्या नेत्यांनी याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय ( Kailash vijayvargiya statement on maharashtra politics )यांनी महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीवर मोठे वक्तव्य केले आहे.

कैलाश विजयवर्गीय

उद्धव ठाकरेंमध्ये मॅच्युरिटी अजून यायची आहे : भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता (vijayvargiya said uddhav thackeray lacks maturity) अजून यायची आहे. कदाचित शिवसेनेती धक्यामुळे त्यांच्यात परिपक्वता येऊ शकते. एकनाथ शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले की, त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी सध्या कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यांचे सरकार महाराष्ट्रात चांगले काम करत आहे. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये येऊ शकतात का, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांना भाजपमध्ये बोलावण्याचा आमची इच्छा नाही, ते आमचे चांगले मित्र आहेत.

22 आमदार सरकारच्या कामावर नाराज? : नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एकनाथ शिंदे यांचे 22 आमदार सरकारच्या कामावर नाराज असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. शिंदे सरकारच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी हे दावे पूर्णत: खोटे असल्याचे म्हटले असले तरी, काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत अशी वक्तव्य ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, सरकार आपल्या कामात व्यस्त असून, विकासकामे करतच राहणार असल्याचे ते म्हणाले होते.

Last Updated : Oct 25, 2022, 8:16 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.