सातारा / गुवाहाटी ( आसाम ) : सातारा जिल्ह्यातील बिजवडी (ता. माण) येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि शिवसैनिक संजय भोसले ( Shivsainik Sanjay Bhosale ) थेट गुवाहाटीत पोहाचले. 'एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परतच ला. उध्दवजी-आदित्यला साथ द्या', असा फलक घेवून तो बंडखोर आमदार असलेल्या हॉटेल बाहेर थांबला ( Shivsainik Protest In Guwahati ) होता. दरम्यान, या शिवसैनिकाला गुवाहाटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात नेले ( Shivsainik Detained In Guwahati ) आहे.
हातात फलक घेऊन बंडखोर आमदारांना साद : सातार्यातील बिजवडी (ता. माण) येथील शिवसैनिक आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे विमानाने गुवाहाटीला गेले आहेत. मातोश्रीवर परत चला, अशी साद घालणारा फलक हातात घेऊन बंडखोर आमदार असलेल्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर ते सकाळपासून थांबले होते. माध्यमांकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जाऊ लागल्यानंतर गुवाहाटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात नेले आहे.
बाळासाहेबांनी सत्ता आणि पदे मिळाली : मी शिवसेनेच्या आमदारांना विनंती करण्यासाठी गुवाहाटीला आलो आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो आशिर्वाद आणि ताकद दिली आहे, ती बाजूला करून ते दुसरीकडे निघाले आहेत. हे चुकीचे होत आहे. बाळासाहेबांमुळेच तुम्हाला सत्ता, पदे मिळाली आहेत. उध्दव आणि आदित्यला साथ द्या, अशी बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला एक साद घातली होती. दिवगंत आनंद दिघे यांच्या तालमीत तयार होऊन तुम्ही उच्च पदावर पोहचला आहात. त्याची प्रतारणा होवू देवू नका. शिवसेने हिंदुत्वाचा मुद्दा कुठेही सोडलेला नाही. उध्दव ठाकरे यांनी नेहमीच हिंदुत्व जपले आहे. मी एक शिवसैनिक म्हणून आलो आहे. जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल, तर परत याल. मी शिवसेना आणि उध्दव ठाकरेंसोबत आहे, असे संजय भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाले.