लखनौ - हनी ट्रॅपमध्ये अडकून उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हनी ट्रॅप गँग उत्तरप्रदेशमधील लखनौ येथील असल्याची माहिती आहे. शिक्षकाच्या कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने लखनौमध्ये तपास सुरू केला आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकला शिक्षक -
आत्महत्या केलेली व्यक्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत प्राचार्य आहे. काही दिवसाअगोदर शिक्षकाचा ऑनलाइन पद्धतीने लखनौ येथील मुलीशी सबंध आला. त्यांच्या फोनवर बोलणं सुरू झाले होते. दोघेही एकमेकांसोबत तासन्-तास बोलायचे. आरोपी मुलीने दिव्या अशी ओळख दिली होती. तसेच अमेरिकेतील एक नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करित असल्याचे त्या शिक्षकाला सांगितले होते. शिक्षका तिच्या जाळ्यात ओढत गेला. काही दिवसानंतर दोघेही व्हिडीओ कॉलवर बोलायला लागले. यादरम्यान तिच्याकडून काही अश्लील वर्तवणूक करण्यात आली आणि त्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. त्यानंतर ही रेकॉर्डिंग शिक्षकाला पाठवून ब्लॅकमेलिंकला सुरूवात केली. शिक्षकाने भीतीपोटी तिच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
शिक्षकाने घर ठेवलं गहाण -
आरोपी मुलीने शिक्षकाकडे दहा लाख रुपयाची सर्वप्रथम मागणी केली. शिक्षकाने हळूहळू ही रक्कम तिला दिली. मात्र त्यानतंरही तिच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरूच होती. शिक्षकाने घरही गहाण ठेवले आणि तिच्या मागणी पूर्ण केल्या. तरीदेखील तिच्याकडून पैशाची मागणी होत होती. याला कंटाळून आणि भीतीपोटी अखेर शिक्षकाने गळफास घेत जीवन संपवले.