अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्री येथे अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येतात. या ठिकाणी पूर्वी पाच रुपये तिकीट भाविकांकडून आकारले जात होते. मात्र, आता 25 रुपये तिकीट आकारले जात आहे. भाविकांकडून तिकीट आकारू नये, अशी मागणी खासदार राहुले शेवाळे यांनी सदनात केली.
संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या इम्तियाज जलील, नवनीत राणा यांसह राज्यातील खासदार संसदेत काय बोलले..?
18:12 December 01
लेण्याद्रीला जाणाऱ्या गणेशभक्तांकडून तिकीट आकारू नये - खासदार शेवाळे
17:06 December 01
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राने विशेष पॅकेज जाहीर करावे - खासदार इम्तियाज जलील
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्जबारीपणाला व शेतात होणाऱ्या नुकसानीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील 150 तर बीड जिल्ह्यातील 174 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्राकडून निधी मिळाला नसल्याने राज्य सरकार शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नाही. केंद्र सरकाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी सदनात केली.
17:03 December 01
अमरावती-नांदेड हिंसाचार : पोलिसांची चौकशी व्हावी - खासदार कोटक
अमरावती व नांदेड येथे हिंसाचार झाला असून या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका करत पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार मनोज कोटक यांनी सदनात केली आहे.
17:00 December 01
पंतप्रधान आवास योजनेसाठी होणाऱ्या विलंबाची चौकशी व्हावी - खासदार राणा
पंतप्रधान आवास योजनेच्या कामासाठी निवृत्त अधिकारी आहेत. ते या योजनेसाठीचे काम अतिशय संथ गतीने करत आहेत. यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी विलंब का होतोय यासाठी एक समिती स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी सदनात केली आहे.
13:22 December 01
लोकसभेत भाजपा खासदार रामदास तडस
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असलेला हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला चालना देण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांनी सदनाच्या पटलावर मांडली.
13:21 December 01
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत केली 'ही' मागणी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात साडे बारा लाख लोक घरापासून वंचित आहेत. त्या सर्वांना घरे मिळावी यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दोन विधेयकं पास करण्यात आली होती. मात्र, सध्याचे महाविकास आघाडी सरकार त्यावर अंमलबजावणी करत नसल्याचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत म्हटले. यात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली.
12:07 December 01
रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासंदर्भात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत आपले प्रश्न मांडले.
12:00 December 01
संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर म्हणजेच गेल्या सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा तिसरा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.