नवी दिल्ली - देशात सद्या महागाईचा भडका उडाला आहे. यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे महागाई वाढत नव्हती. मात्र, निवडणुका संपताच देशात महागाई वाढू लागली आहे. त्यामुळे या देशातल्या महागाईला केवळ निवडणुकाच थांबवू शकते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोकण रेल्वेचा समावेश भारतीय रेल्वेत होणार? : आज लोकसभेत रेल्वे संबंधीत प्रश्नोउत्तराच्या तासाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेचा समावेश भारतीय रेल्वेत होणार, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कोकण रेल्वेशी संबंधीत अनेक प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केले.