ETV Bharat / bharat

Breaking News Live: केरळातील ट्रान्सजेंडर जोडपे झिया आणि जहादला झाला मुलगा - undefined

MAHARASHTRA LIVE UPDATES BREAKING CRIME POLITICAL NEWS TODAY
तुर्की, सीरियातील भूकंपात ७ हजार ७०० लोकांचा मृत्यू
author img

By

Published : Feb 8, 2023, 8:23 AM IST

Updated : Feb 8, 2023, 7:47 PM IST

19:43 February 08

ट्रान्सजेंडर जोडपे झिया आणि जहादला झाला मुलगा

कोझिकोड (केरळ) - ट्रान्सजेंडर जोडपे झिया आणि जहाद यांनी आज बाळाला जन्म दिला. जहाद हा ट्रान्स मॅन गरोदर होता. त्याला आज मुलगा झाला. जहादची जोडीदार, झिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे म्हटले आहे. ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानते, असेही ती म्हणाली आहे.

19:39 February 08

धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उद्या दुपारी २ वाजता देणार उत्तर

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उद्या दुपारी २ वाजता उत्तर देतील. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी याची माहिती दिली.

19:19 February 08

14 फेब्रुवारीला लागणारा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल - शंभूराज देसाई

ठाणे - शंभुराज देसाई यांनी सत्ता संघर्षावर वक्तव्य करत 14 फेब्रुवारीला लागणारा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे उद्धव गटावर सडकून टीका केली. राज्यातील या सत्तासंघर्षामध्ये सर्वात जास्त आमदार आणि खासदार आमचे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आमच्याच बाजूने निकाल देतील असा विश्वास यावेळी ठाण्याचे पालकमंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

18:58 February 08

नागपूर स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यासाठी कडक सुरक्षा

नागपूर - उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यासाठी शहरातील व्हीसीए स्टेडियममध्ये किमान २,००० पोलीस कर्मचारी तैनात केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. क्विक रिस्पॉन्स टीमचे कर्मचारी जामठा परिसरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या दोन शहरातील हॉटेल्स, जिथे खेळाडू सध्या मुक्काम करत आहेत, त्या मार्गावर तैनात केले जातील, असे ते म्हणाले.

18:45 February 08

पंतप्रधानांनी भाषणबाजी केली, परंतु विरोधकांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही - शशी थरूर

पंतप्रधानांनी लोकसभेत भाषण तर चांगले केले. परंतु त्यांनी विरोधकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

18:37 February 08

नालासोपारा पोलीस ठाण्यात नऊ कैद्यांना जणांनी अन्नातून विषबाधा

पालघर - जिल्ह्यातील नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्तात कैदेत असलेल्या नऊ जणांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

18:27 February 08

ठाण्यातील डॉक्टर दाम्पत्याची साडेतेवीस लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मिळवली

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील एका डॉक्टर दाम्पत्याची 23.50 लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग एक्स्प्रेस ट्रेनमध्ये विसरली होती. ही बॅग रेल्वे पोलिसांनी अहमदाबादमधील एका व्यक्तीच्या घरातून जप्त केली. बॅगेतील सर्व मौल्यवान वस्तू त्यामध्ये होत्या असे पोलिसांनी सांगितले.

18:14 February 08

त्यांना त्यांच्या मित्रांचा बचाव करायचा आहे, अदानींचे नाव न घेता राहुल गांधींचा मोदींना टोला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही चौकशीसंदर्भात चकार शब्द काढला नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, त्यांना त्यांच्या मित्रांचा बचाव करायचा आहे. मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींच्या भाषणावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

17:16 February 08

देशाला 100 व्या स्वातंत्र्य दिनी एक महान देश बनवल्याचे दाखवून देऊया - मोदी

राजकीय मतभेद होऊ शकतात. वैचारिक मतभेद होऊ शकतात. मात्र देशाला 100 व्या स्वातंत्र्य दिनी एक महान देश बनवल्याचे दाखवून देऊया असे प्रतिपादन मोदींनी केले.

17:09 February 08

निराशावादी लोकांनी आत्मचिंतन करण्याची गरज - मोदींचा विरोधकांना टोला

निराशावादी लोकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आता लोक जम्मू-काश्मीरमध्ये निवांत फिरू शकतात. मात्र एक काळ होता. त्यावेळी लालचौकात तिरंगा फडकवण्यास दहशतवाद्यांनी पोस्टर लाऊन आव्हान दिले होते. त्या काळात दहशतवाद्यांना आव्हान देऊन तिरंगा फडकवला होता.

17:04 February 08

देशात सर्वाधिक खर्च मूलभूत सुविधांच्यावर केला जात आहे - मोदी

देशात सर्वाधिक खर्च मूलभूत सुविधांच्यावर केला जात आहे. रस्त्यांचे जाळे वाढत आहे. रेल्वेट्रॅक वाढत आहेत. रेल्वेची ओळख सरकारने बदलली. एकेकाळी रेल्वे म्हणजे लेट लथीफ अशी ओळख होती. आता वंदे भारतची मागणी प्रत्येक खासदार करत आहे. विमानतळे बनत आहेत. देश आधुनिकतेकडे जावा यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत.

17:01 February 08

मध्यम वर्गासाठी सरकारने मोठे काम केले - मोदी

सरासरी 20 जीबी डाटा लोक खर्च करतात. त्यातून सुमारे 5000 रुपये त्यामुळे वाचतात. जनऔषधीमुळे मध्यमवर्गाचे 20 हजार कोटी वाचले. मध्यम वर्गासाठी सरकारने मोठे काम केले.

16:56 February 08

माता भगिनींची सेवा करण्याची सर्वाधिक संधी आमच्या सरकारला मिळाली - मोदी

माता भगिनींची सेवा करण्याची सर्वाधिक संधी आमच्या सरकारला मिळाली आहे. उज्वला योजनेतून महिलांची धुरापासून मुक्ती केली. मायनिंगपासून मिलीटरीपर्यंत महिलांसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

16:49 February 08

मुसिबत के समय मोदी काम आया है... हे लोक कसे विसरतील - मोदी

मुसिबत के समय मोदी काम आया है, असे सांगून लोकांची कामे झाली, गॅस मिळाला, आरोग्य मिळाले, मदत मिळाली ते तुमच्या खोटेपणावर कसा विश्वास ठेवतील, असा सवाल मोदींनी केला. विश्वासाचे सुरक्षा कवच भेदू शकत नाही, असेही ते म्हणाले.

16:46 February 08

देशाचा मोदीवर जो विश्वास आहे, तो विरोधकांच्या समजण्याच्या पलिकडे आहे - मोदी

जीवन देशासाठी समर्पित केले आहे. देशासाठी जगलो आहे. देशाचा मोदीवर जो विश्वास आहे, तो विरोधकांच्या समजण्याच्या पलिकडे आहे.

16:43 February 08

तुम्हारे पाव के निचे कोई जमीन नही, फिर भी तुम्हे यकीन नही हेच विरोधकांना लागू पडते - मोदी

दष्यंत कुमार यांनी म्हटले आहे की, तुम्हारे पाव के निचे कोई जमीन नही, फिर भी तुम्हे यकीन नही हेच विरोधकांना लागू पडते अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.

16:39 February 08

ईडीने विरोधकांना एकत्र आणले - मोदींचा टोला

ईडीने विरोधकांना एकत्र आणले. देशाची जनता याना एकत्र आणू शकली नाही. मात्र चौकशी संस्थेमुळे हे एकत्र आले, असा टोला मोदींना लगावला.

16:35 February 08

कोर्ट, चौकशी संस्था, शिखर बँक यांना शिव्या देण्याचे काम विरोधक करत आहेत - मोदी

विरोधात निकाल आला की सुप्रीम कोर्टाला शिव्या द्यायच्या. चौकशी होत असेल तर तपास संस्थांना शिव्या द्यायच्या. आर्थिक प्रगतीचा गौरव झाला की आरबीआयला शिव्या द्यायच्या. हे सध्या सुरू आहे अशी टीका मोदींना केली.

16:31 February 08

2014 पूर्वीचे दशक होते ते लॉस्ट डिकेड म्हणून लक्षात राहील - मोदी

2014 पूर्वीचे दशक होते ते लॉस्ट डिकेड म्हणून लक्षात राहील. तर त्यानंतरचे दशक भारताचे दशक म्हणून मानले जाईल.

16:26 February 08

संधीचे सोने करण्याऐवजी विरोधक भ्रष्टाचारात अडकत गेले - मोदी

विरोधक टूजीमध्ये अडकले, नोट फॉर व्होटमध्ये अडकले. क्रीडा क्षेत्रातही तेच झाले. या शब्दात मोदींनी युपीएवर टीका केली.

16:22 February 08

देश प्रगतीपथावर असला तरी काही लोक निराश आहेत - मोदींचा विरोधकांना चिमटा

देश प्रगतीपथावर असला तरी काही लोक निराश आहेत, याचे आश्चर्य वाटते. मागील 10 वर्षापूर्वी महागाई दोन अंकी होती. अशा परिस्थितीत विकास दिसल्यावर निराशा येते. तसेच झाले आहे.

16:17 February 08

भारत मोबाईलफोन निर्मितीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर - मोदी

देशात गेल्या 9 वर्षात 90 हजार स्टार्टअप सुरू झाले आहेत. कमी वेळात एवढी मोठी प्रगती झाली आहे. भारत मोबाईल निर्मितीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊर्जा वापरात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहे. क्रीडा क्षेत्रात सर्वच प्रकारात भारताचे खेळाडू चमकत आहेत.

16:15 February 08

डिजीटल इंडियाचा जगभरात बोलबाला आहे - मोदी

डिजीटल इंडियाचा जगभरात बोलबाला आहे. सर्वांना त्याचे अप्रुप आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने मोठी कामगिरी केली आहे. लस घेतल्यावर दुसऱ्या सेकंदाला त्याचे प्रमाणपत्र मिळते. ही ताकद निर्माण झाली आहे.

16:12 February 08

देशात मजबूत निर्णायक सरकार आहे - मोदी

देश सकारात्मक आहे. देशात मजबूत निर्णायक सरकार आहे. देशाला जे हवे आहे ते हे सरकार देत आहे. कोरोनात मेड इन इंडिया लस तयार झाली. लसिकरण मोहीम राबवण्यात आली. कोट्यवधी लोकांनी मोफत लस दिली. अनेक देशांना औषधे, लस पुरवली.

16:11 February 08

आदिल दुरानी यास न्यायालयीन कोठडी

राखी सावंत हिचा पती आदिल दुरानी यास न्यायालयीन कोठडी

16:07 February 08

देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था - मोदी

कोरोनाच्या महामारीच्या काळात देश सावरला आहे. देशाला सावरले आहे. देश भूषणावह स्थितीमध्ये आहे. याचा गर्व आहे. देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. देशात सकारात्मकता आहे. विश्वास आहे. जगातील सर्वात महत्वाच्या देशांच्या नेतृत्वाची संधी मिळाली ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

16:03 February 08

देश आज जगाच्या समस्यांच्या उत्तरांचा भाग बनत चालला आहे हे राष्ट्रपतींचे म्हणणे कुणीच खोडले नाही - मोदी

देश आज जगाच्या समस्यांच्या उत्तरांचा भाग बनत चालला आहे, असे राष्ट्रपतींनी म्हटले होते. त्यावर कुणाचाच आक्षेप नाही असे दिसले, असे मोदींनी लोकसभेत सांगितले.

15:59 February 08

वो अब आ चुके है... असे सांगत नाव न घेता मोदींचा विरोधकांवर निशाणा

ये कह कहकर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ चुके है नाव न घेता मोदींचा विरोधकांवर निशाणा.

15:55 February 08

राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव वाढवला - मोदी

राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव वाढवला आहे. पंतप्रधान मोदींचे लोकसभेत प्रतिपादन

15:53 February 08

पंतप्रधानांच्या भाषणावर काही विरोधी पक्षांचा सभात्याग

15:51 February 08

पंतप्रधानांचे भाषण लोकसभेत सुरू

पंतप्रधानांचे भाषण लोकसभेत सुरू

15:48 February 08

नेहरुंच्या काळात जर मोदी असले असते तर एक इंचही जमीन चीन घेऊ शकला नसता - खा. दिलीप सैकिया

नेहरुंच्या काळात जर मोदी असले असते तर एक इंचही जमीन चीन घेऊ शकला नसता, असा दावा भाजप खा. दिलीप सैकिया यांनी केला.

15:43 February 08

देश नामदेव आणि तुकारामांचा आहे, हा देश सर्वांचा आहे, हा देश वाचवा - अधिररंजन चौधरी

आपला देश नामदेव आणि तुकारामांचा आहे. हा देश सर्वांचा आहे. हा देश वाचवा असे आवाहन अधिररंजन चौधरी यांनी शेवटी केले.

15:30 February 08

भाजपने एका आदिवासीला राष्ट्रपती केल्याचे सांगण्यात येते हे पदाचे राजकारण योग्य नाही - चौधरी

यापूर्वी आपण राष्ट्रपतींच्या जाती किंवा धर्माविषयी ऐकले नव्हते, पण पहिल्यांदाच भाजपने एका आदिवासीला राष्ट्रपती केल्याचे देशभरात सांगण्यात येत आहे. हा राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे. असा थेट आरोप काँग्रेस खासदार चौधरी

15:22 February 08

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसोबत गैरप्रकार, आरोपीला अटक

मुंबई - मंत्रालयात काम करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसोबत घडला गैरप्रकार, आरोपीला अटक

15:01 February 08

राहुल गांधींचा निशाणा योग्य ठिकाणी लागला विरोधकच बनले पप्पू - अधिररंजन चौधरी

राहुल गांधी यांनी वर्मावर बोट ठेवले आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्ष खवळला आहे. त्यांना निशाणा बनवल्यामुळे सत्ताधारीच पप्पू बनले आहेत. अधिररंजन चौधरी यांनी हे वक्तव्य लोकसभेत केले आहे.

14:52 February 08

फुटपाथवर स्टॉल उभारण्यास पालिकेनेच परवानगी देणे अयोग्य - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - पदपथाचा उद्देश वाहतूक सुरळीतपणे चालणे सुनिश्चित करणे आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र एखाद्या नागरी संस्थेने स्टॉल मालकांना फूटपाथच्या मधोमध स्टॉल उभारण्याची परवानगी दिल्यास हा उद्देश फोल ठरतो. असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

14:46 February 08

8.5 लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी BMC अभियंत्याला अटक

मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेकायदेशीर घर पाडण्यापासून वाचवण्यासाठी 8.5 लाख रुपयांची लाच घेताना मुंबई महापालिकेच्या एका अभियंत्यासह दोघांना अटक केली आहे. एसीबीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

14:38 February 08

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

केंद्रशासित प्रदेशातील जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दिल्लीत झालेल्या निषेधादरम्यान पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

14:28 February 08

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश सर्व समाजाला घेऊन प्रगतीपथावर - रामदास आठवले

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर आहे. त्यामुळे काही चिंता करण्याचे कारण नाही. सर्व समाजाचा विकास साधत देश पुढे जात आहे, या शब्दात मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत प्रतिक्रिया दिली.

14:23 February 08

शिवशाही एसटी बसचे टायर फुटल्याने अपघात, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

बीड - माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील सुंदरराव सोळुंके सहकारी साखर कारखाना परिसरात शिवशाही एसटी बसचे अचानक टायर फुटल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने जिवीत हानी टळली. गाडी क्रमांक MH-09 EM 2231 धारूर वरून औरंगाबादकडे जाणाऱ्या शिवशाहीचे आज सकाळी आठच्या सुमारास चौकात टायर फुटले. यामुळे बस दुभाजकावर धडकली. चांगली गोष्ट म्हणजे 30 प्रवाशी सुखरूप आहेत. पाच ते सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

14:19 February 08

मुंबई विमानतळासंदर्भात राहुल गांधींचा आरोप अयोग्य - जीव्हीकेचे उपाध्यक्ष जीव्ही संजय रेड्डी

मुंबई विमानतळ अदानींच्या ताब्यात देण्यावर कोणताही दबाब नव्हता. राहुल गांधी यांच्या आरोपावर जीव्हीकेची ही प्रतिक्रिया आली आहे. आमच्या व्यवहाराशी संबंधित असा कोणताही नियम नव्हता, असे सांगून अदानी समूहाला विमानतळ मिळवून देण्यासाठी नियम बदलण्यात आल्याच्या राहुल गांधींचा आरोप योग्य नसल्याचे जीव्हीकेचे उपाध्यक्ष जीव्ही संजय रेड्डी यांनी स्पष्ट केले.

14:10 February 08

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्काराची घोषणा केली.

13:32 February 08

मातोश्रीवर मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

  • विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख उपस्थित

    महिला कार्यकर्त्यांची बैठक सुरू

    सेनेला वरळीत लागलेली गळती आणि आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे समजते

13:22 February 08

ठाण्यात अल्पवयीन नातेवाईकावर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे - एका 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यात एका शिक्षकाने इयत्ता 6 मधील विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावले आणि त्यांना कळवले की मुलाच्या वागणुकीत बदल झाला आहे. तो इतर मुलांशी गैरवर्तन करत आहे आणि वारंवार चिडचिड करत आहे, असे कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

13:06 February 08

मुस्लिमांच्याबद्दल मोदी सरकारची भेदभावाची वागणूक - ओवेसी

मोदी सरकार मुस्लीमांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. बिल्किस बानो प्रकरणी न्याय मिळत नाही. तिचे नाव आणि ती मुस्लिम आहे म्हणूनच न्याय मिळत नसल्याचा थेट आरोप लोकसभेत एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी केला.

13:02 February 08

मोदींच्या काळातील सर्वच घोटाळ्यांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करा - खरगे

मोदींच्या काळातील सर्वच घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी एक संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन सर्वच घोटाळ्यांची चौकशी करावी, असे सांगून खरगे यांनी त्यांचे भाषण संपवले.

12:59 February 08

तुम्ही माझ्यावर जेपीसी स्थापन कराल असे दिसते - जगदीप धनखर

अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी करणारे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या बदल्यात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, तुम्ही माझ्यावर जेपीसी स्थापन कराल असे दिसते.

12:49 February 08

मी खरे बोललो तर ते देशद्रोही आहे का? - मल्लिकार्जुन खरगे

खरगे यांनी उद्विग्न होऊन राज्यसभेत सांगितले की मी खरे बोललो तर ते देशद्रोही आहे का? मी देशद्रोही नाही. मी इथल्या इतर कोणापेक्षाही जास्त देशभक्त आहे. मी 'भूमी-पुत्र' आहे. तुम्ही देशाची लूट करत आहात आणि मी देशद्रोही असल्याचे सांगत आहात. हे योग्य नाही असे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

12:46 February 08

सर्वप्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडून आलेल्यांच्या आधारावरच जर निर्णय द्यावा असे असेल तर ते हस्यास्पद आहे. विधान परिषद निवडणुकीत गद्दारी करुन जे बाहेर पडले त्यांनी शिवसेनेवर दावा केला, हा विकृतपणा आहे. सर्वप्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे. जर सदस्य अपात्र होणार असतील तर त्यांचा दावा आयोगासमोर कसा असेल, त्यामुळं अपात्रतेचा निर्णय होण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले.

12:42 February 08

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आम्ही आहोत याचा अभिमान - रवीशंकर प्रसाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आम्ही आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, असे रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सांगितले. संघाला लोकांनी स्वीकारले. सत्तेत बसवले. तुम्ही किती रसातळाला पोहोचलात अशी टीका प्रसाद यांनी काँग्रेसवर केली.

12:35 February 08

वाढरा मॉडेल ऑफ डेव्हलपमेंटवरुन काँग्रेसवर रवीशंकर प्रसाद यांचा पलटवार

वाढरा मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट असा आरोप करुन हरियाणातील प्रकल्पासंदर्भात लोकसभेत रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर आरोप केला.

12:31 February 08

उघडपणे पंतप्रधानांना टारगेट करणे खपवून घेणार नाही - निर्मला सीतारामन

आम्ही डेटा देत आहोत असे म्हणणे ठीक आहे. मात्र त्याची पुष्टी झाली पाहिजे. परंतु विरोधक पूर्णपणे पीएम मोदींच्या विरोधात बोलत आहेत. आमचा त्यास आक्षेप आहे. विरोधक उघडपणे पंतप्रधानांना टारगेट करत आहेत ते खपवून घेतले जाणार नाही.

12:27 February 08

तुम्ही लूट करत आहात आणि ते आम्हाला सांगूही देत नाही हे चुकीचे - खरगे

तुम्ही लूट करत आहात. आणि ते आम्हाला सांगूही देत नाही हे चुकीचे आहे, असे उद्विग्नतेने खरगे यांनी राज्यसभेत सुनावले.

12:24 February 08

राहुल गांधी यांनी लोकसभेची दिशाभूल केली - रवी शंकर प्रसाद

राहुल गांधी यांनी लोकसभेची दिशाभूल केली असा आरोप भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी लोकसभेत केला.

12:18 February 08

सार्वजनिक उद्योग खासगी मालकानी खायला सुरुवात केली - खरगे

सार्वजनिक उद्योग खासगी मालकानी खायला सुरुवात केली आहे. त्यांनी जनतेच्याच पैशाने जनतेचेच प्रकल्प खाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नोकऱ्याही त्यांनी खाल्ल्या हे चुकीचे आहे.

12:03 February 08

बिनबुडाच्या परदेशी अहवालाचा हवाला देऊन आरोप होत आहेत ही काँग्रेसची जुनी सवय - गोयल

बिनबुडाच्या परदेशी अहवालाचा हवाला देऊन आरोप होत आहेत. ही काँग्रेसची जुनी सवय आहे. काँग्रेसच्या नेत्यांची संपत्ती जर पाहिली तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे मंत्री गोयल यांनी राज्यसभेत सुनावले.

11:58 February 08

मै ना खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणणारे काही उद्योजकांना का खाऊ घालत आहेत - खरगे

मै ना खाऊंगा ना खिलावूंगा असे म्हणणारे काही उद्योजकांना का खाऊ घालत आहेत, ते समजेल का, असा सवाल खरगे यांनी केला.

11:56 February 08

बोलावे कसे तेही शिकवणार का, खरगे यांचा उपराष्ट्रपतींना सवाल

मला आता बोलावे कसे तेही आपण शिकवणार का, मल्लीकार्जुन खरगे यांचा उपराष्ट्रपतींना सवाल

11:51 February 08

उपराष्ट्रपती धनखर यांनी खरगे यांना त्यांच्या वक्तव्यावरुन खडसावले

उपराष्ट्रपती धनखर यांनी खरगे यांना त्यांच्या वक्तव्यावरुन खडसावले. राज्यसभेत गदारोळ सुरू

11:49 February 08

देशभरात जातीधर्माच्या नावाने मंत्री आणि नेते नफरत फैलावत आहेत - खरगे

जात, धर्म, पेहराव या सगळ्याच्या नावाखाली द्वेश पसरवला जात आहे. देशभरात याच माध्यमातून आपलेच मंत्री आणि नेते नफरत फैलावत आहेत.

11:46 February 08

मल्लीकार्जुन खरगे यांचा सरकारवर घणाघात, कार्यपद्धतीचे काढले वाभाडे

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे यांचा सरकारवर घणाघात. कार्यपद्धतीचे काढले वाभाडे.

11:35 February 08

महामार्गावरील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी FASTag मुळे यश, 6 जणांना अटक

ठाणे - मुंबई-पुणे महामार्गावरील 2.17 लाख रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात FASTag प्रणालीमुळे नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. यासंदर्भात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

11:31 February 08

BRS, AAP च्या खासदारांचा राज्यसभेतून सभात्याग

BRS, AAP या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. त्यांच्या तहकूब नोटिसांना अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला.

11:28 February 08

आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेतील सुरक्षेतील त्रुटींबद्दल दानवे यांचे डीजीपींना पत्र

औरंगाबाद - शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून औरंगाबाद जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेदरम्यान सुरक्षेतील दुर्लक्षाची गंभीर दखल घ्यावी, असे निवेदन केले आहे.

11:08 February 08

बाळासाहेब थोरातांची बैठकीला दांडी, कामकाज सल्लागार समितीची बैठकीला सुरुवात

कामकाज सल्लागार समितीची बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उपस्थित

काँग्रेसकडून अमीन पटेल आणि अशोक चव्हाण,

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार, जयंत पाटील छगन भुजबळ

बाळासाहेब थोरात यांनी तब्येतीचे कारण देत अनुपस्थिती

पक्ष नेत्यांचा राजीनामा दिल्याने चर्चा उधाण

10:59 February 08

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार..

09:32 February 08

मोदींबद्दल बदनामीकारक वक्तव्य.. राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार नोटीस

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत "पंतप्रधान मोदींविरुद्ध काही असत्यापित, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक विधाने" वापरल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार नोटीस दिली.

08:43 February 08

आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ घालणारे शिंदे गटाच्या आमदाराच्या नावाने घोषणा देत होते, कारवाई करा: अंबादास दानवे

आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सरकारचे देखील आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. सदर गोंधळ घालणारे मिंधे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य साहेबांच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

08:33 February 08

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक होणं चुकीचं.. सुरक्षेत वाढ करावी: भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी

08:30 February 08

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ.. अंबादास दानवे यांचं पोलीस महासंचालकांना पत्र

  • अंबादास दानवे यांचं पोलीस महासंचालकांना पत्र
  • आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा आरोप
  • आदित्य ठाकरे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

08:24 February 08

एकवेळ होती जेव्हा काश्मिरात तिरंगा फडकावला म्हणून मला तुरुंगात टाकण्यात आलं होतं: अनुराग ठाकूर

2010 ते 2017 या काळात मी सर्वात जास्त काळ भाजप युवा शाखेचा अध्यक्ष होतो. राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी मी कोलकाता ते काश्मीर अशी यात्रा काढली. J&K मध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी मला तुरुंगात टाकण्यात आले, आज मी पाहतो की J&K असे कोणतेही बंधन नसलेले वेगळे राज्य आहे: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

08:12 February 08

MAHARASHTRA LIVE UPDATES BREAKING CRIME POLITICAL NEWS TODAY

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार तुर्की आणि सीरियामध्ये शक्तिशाली भूकंपांमुळे आतापर्यंत 7,700 लोकांचा मृत्यू झाला आहे. व्यापक विध्वंस दरम्यान मृतांची संख्या वाढतच आहे.

Last Updated : Feb 8, 2023, 7:47 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.