ETV Bharat / bharat

Maharashtra Hill Stations : महाराष्ट्रातील 'या' तीन हिल स्टेशनला नक्की भेट द्या

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नवनव्या ठिकाणी भेट देणे हे आजकाल सर्वांना आवडते. वातावरणात आता गारवा जाणवायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आपण आज महाराष्ट्रातील हिल स्टेशन ( Maharashtra hill station ) आणि तिथल्या पर्यटन ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत.

Maharashtra Hill Stations
Maharashtra Hill Stations
author img

By

Published : Oct 12, 2022, 1:08 PM IST

नवी दिल्ली - स्वत:ला टवटवीत राखण्यासाठी काहींना सुंदर स्थळी जायला आवडते. बहुतेकदा यासाठी उंचावरची ठिकाणे निवडी जातात. उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी थंड, सुखदायक वातावरण आणि मंद वाऱ्याची झुळूक देणारे डोंगराळ भाग नेहमीच लक्षवेधी ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का की पश्चिम घाट, विशेषत: महाराष्ट्र राज्यात भारतातील काही सर्वात सुंदर आणि हिरव्यागार वृक्षांनी बहरलेले हिल स्टेशन आहेत. प्रमुख शहरांपासून काही तासांच्या अंतरावर ही हिल स्टेशन्स आहेत. त्यामुळे, जर तुम्ही वीकेंडला लवकर सुटण्यासाठी जाण्याचा विचार करत असताल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्की फायदेशीर आहे.

1. माथेरान : पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेले, माथेरान, ज्याला 'भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन' म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून 2,600 फूट उंचीवर आहे. मुंबईपासून अवघ्या 100kms अंतरावर माथेरान आहे. त्यामुळे माथेरान हे मित्र आणि कुटुंबियांसोबत वीकेंडला जाण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हे भारतातील एकमेव हिल स्टेशन आहे जिथे कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नाही. हिरवेगार डोंगर, तांबडी माती आणि प्रसिद्ध माथेरान टॉय ट्रेन यामुळे त्याच्या हिल टाऊनची भेट कायम लक्षात राहील याची खात्री आहे.

लुईसा पॉइंट : पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. शार्लोट लेक - या ठिकाणी गर्दी करणाऱ्या अनेक पक्ष्यांची झलक पाहण्यासाठी भेट द्या. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी देखील उत्तम ठिकाण आहे. शिवाजी शिडी - हा शिडीच्या आकारात पायऱ्या असलेला मार्ग आहे. हे माथेरानमधील सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग पॉइंट्सपैकी एक आहे. असे म्हणतात की मराठा सम्राट छत्रपती शिवाजी यांनी माथेरानमधील शिकारीसाठी या मार्गाचा वापर केला होता. वन ट्री हिल पॉइंट - सर्वात निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. तिथे टेकडीच्या माथ्यावर फक्त एक झाड उगवल्यामुळे हे नाव देण्यात आले होते.

2. महाबळेश्वर : महाबळेश्वरला मिनी काश्मीर असे ( Mahabaleshwar Mini Kashmir ) म्हणतात. मुंबईपासून २८५ किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर आहे. 'स्ट्रॉबेरीची भूमी' ( Mahabaleshwar Strawberry Land ) म्हणूनही ओळखले जाणारे महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात अव्वल स्थानात गणले जाते. हे हिल स्टेशन त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये असंख्य नद्या, धबधबे, भव्य दृश्य स्थळे, तलाव आहेत. महाबळेश्वर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्रही मानले जाते. कारण येथूनच कृष्णा नदीचा उगम होतो. या ठिकाणी प्राचीन महाबळेश्वर शिवमंदिर देखील आहे.

एलिफंट हेड : महाबळेश्वरमधील सर्वात नयनरम्य दृश्यांपैकी एक, असलेले एलिफंट हेड सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विहंगम दृश्य देते. एलिफंट हेड हत्तीच्या डोके आणि सोंडेसारखे दिसते. चायनामन्स फॉल - परिसरातील चिनी तुरुंगाच्या नावावर असलेला एक शक्तिशाली धबधबा आहे. आर्थर सीट - महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय दृश्यांपैकी एक आर्थर सीट, ज्याला सुसाईड पॉइंट देखील म्हटले जाते, ब्रह्मा-अरण्य दरी आणि सावित्री नदीचे विहंगम दृश्य येथे आहे. वेण्णा लेक - वेण्णा लेक हा एक निसर्गरम्य कृत्रिम तलाव आहे. तिथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. पाचगणी - सभोवतालच्या पाच टेकड्यांवरून त्याचे नाव पडलेले पडले आहे. पाचगणी हे महाबळेश्वरजवळचे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. पाचगणी हे त्याच्या सूर्यास्त आणि सूर्योदय तसेच निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रतापगड किल्ला - महाबळेश्वर जवळ अलेला प्रतापगड किल्ला समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे. एकेकाळी छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेला हा किल्ला आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

3. माळशेज घाट : पश्चिम घाटातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ, माळशेज ही एक पर्वतीय खिंड आहे. मुंबई आणि पुणे या व्यस्त शहरांमधून उत्तम गेटवे आहे. माळशेज हे गुलाबी फ्लेमिंगोसाठी ( flamingo in Malshej ghat ) विशेषतः प्रसिद्ध आहे. फ्लेमिंगो पक्षी जुलै आणि सप्टेंबरमध्ये येथे स्थलांतर करतात. हे हिल स्टेशन पावसाळ्यात विशेषतः लोकप्रिय आहे. फ्लेमिंगोची एक झलक पाहण्यासाठी आणि हिरव्यागार टेकड्यांचा अनुभव घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे. त्याशिवाय काळू नदीवरचा धबधब्या विलक्षम दिसतो.

माळशेज धबधबा : माळशेज धबधबा पश्चिम घाटातील जंगलांमध्ये वाहणारा धबधबा आहे . हरिश्चंद्रगड - समुद्रसपाटीपासून 4670 फूट उंचीवर असलेला 6व्या शतकातील डोंगरी किल्ला आहे. तो पर्यटनासाठी एक लोकप्रिय ट्रेकिंग स्पॉट आहे. आजोबा हिल फोर्ट - ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी आणखी एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे आजोबा हिल फोर्ट. पिंपळगाव जोगा धरण - पिंपळगाव जोगा धरण पुष्पावती नदीवर बांधलेले विस्तीर्ण धरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.