प्रयागराज - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांच्य मृत्यू प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील सुनील चौधरी यांनी दाखल केली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांचा सोमवारी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ते पाहता रहस्यमय निर्माण झाला आहे. आखाडामधील काही सदस्यांनी गिरी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवर शंका व्यक्त केली आहे. महंत यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला हरिद्वारमधून अटक करण्यात आली आहे. महंत गिरी यांनी जीवनात कधीही पत्र लिहिले नाही. त्यामुळे एवढे लांबलचक पत्र लिहिणे शक्य नाही, असा दावा आनंद गिरी यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातमी वाचा-महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ
निष्पक्ष चौकशी करणे हा एकमेव मार्ग-माजी खासदार कटियार
नरेंद्र गिरी कधीही आत्महत्या करणार नाहीत, असे विविध संतांचे म्हणणे आहे. महंत यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही जणांचा वारस म्हणून उल्लेख केला आहे. चिठ्ठीत नाव लिहिलेले आनंद गिरी, हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे माजी खासदार विनय कटियार यांनी महंत नरेंद्र यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष चौकशी करणे हा एकमेव मार्ग असल्याचे माजी खासदार कटियार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-आताच सावध व्हा.. सेक्स अॅडिक्शनमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनीदेखील महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वामी चिन्मयानंद हे मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू हा एक राजकीय डाव आहे. त्यांना सुरक्षा मिळाली नसल्याच्या बातमीचा वापर हा मुख्यमंत्र्यांविरोधात केला जाऊ शकतो. कारण, काही राजकीय लोक हे योगी आदित्यनाथ यांची बदनामी करू इच्छित आहेत.
हेही वाचा-सत्ता द्या, दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास करणार; केजरीवालांचे गोमंतकीयांना आश्वासन