ETV Bharat / bharat

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन - Kumbh Mela 2021

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. महामंडलेश्वर कपिल देव यांना 3 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी निकामी होणे आणि ताप येणे ही समस्या होती, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्णालयाचे संचालक पवन शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

कपिल देव
कपिल देव
author img

By

Published : Apr 15, 2021, 11:00 PM IST

डेहराडून - निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे डेहराडून येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून ते हरिद्वारमध्ये आले होते. कुंभमेळ्यात कोरोनाने निधन होणारे कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत.

महामंडलेश्वर कपिल देव यांना 3 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी निकामी होणे आणि ताप येणे ही समस्या होती, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्णालयाचे संचालक पवन शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

महंत नरेंद्र गिरींनाही झाला होता कोरोना -

अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यावर एम्स ऋषिकेश येथे उपचार सुरू आहेत. नरेंद्र गिरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तेव्हा त्यांना हरिद्वार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एम्स हृषीकेशमध्ये हलवले. सध्या महंत नरेंद्र गिरी यांची प्रकृती स्थिर आहे.

उत्तराखंडमध्ये कोरोनाचा उद्रेक -

उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षानुसार 10 एप्रिल रोजी 254, 11 एप्रिलला 386, 12 एप्रिलला 408, 13 एप्रिलला 594 आणि 14 एप्रिलला 525 रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ असूनही कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट -

कुंभमेळा हरिद्वारमध्ये सुरू असून 27 एप्रिल रोजी संपणार आहे. अलाहबाद म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर तीन वर्षांनी एका ठिकाणी, अशा प्रकारे बार वर्षांत या चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, यंदा त्यावर कोरोनाचे सावट पडलं आहे.

हेही वाचा - वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची 'नीट' परीक्षा पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.