ETV Bharat / bharat

वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती, जादूगार आनंदने दाखवले जादूचे खेळ - जादूचे खेळ

गोरेला पेंद्र मारवाहीमध्ये जादूगार आनंदने जादूच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशानेच पोलीस विभागाने जादूगार आनंदची मदत घेतली होती. (magician Anand awareness about traffic rules). (awareness about traffic rules by performing magic).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 9, 2022, 10:32 PM IST

गौरेला पेंद्रा मारवाही (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील गोरेला पेंद्रा मारवाही जिल्ह्यात शुक्रवारी जादूगार आनंदने रस्त्यावर अप्रतिम स्टंट दाखवले. जादूगार आनंद बाईकवर डोक्याशिवाय दिसला आणि बाईक चालवताना वाहतूक नियमांचे भान ठेवण्याचे आवाहन जिल्ह्यातील रहिवाशांना केले. (awareness about traffic rules by performing magic). प्रसिद्ध जादूगार आनंद (magician Anand) अनेक वर्षांनंतर गोरेला येथे दाखल झाला आहे. त्याचा शो येथे आयोजित केला जात आहे. कार्यक्रमापूर्वी पोलिस विभागाच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियमांबाबत काढण्यात आलेली जनजागृती रॅली गोरेला येथून पेंद्रात पोहोचली आणि त्यानंतर गोरेला येथे सांगता झाली. जादूगार आनंदचे सहाय्यक आकाश यांनी सांगितले की, "वाहतूक नियम शास्त्रोक्त आहेत. ज्या क्षणी तुम्ही आणि मी वाहतूक नियमांचे पालन करण्यास सुरुवात करू, त्याच क्षणी आपले जीवन सुरक्षित होते. त्यामुळे जादूगार असल्याने आनंदने खास गेटअप परिधान करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला". (magician Anand awareness about traffic rules).

वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती

जादूच्या प्रयोगांद्वारे जनजागृती : गौरेला पेंद्र मारवाहीचे ट्रॅफिक इन्चार्ज प्रवीण द्विवेदी म्हणाले की, "जादूगार आनंद न पाहता वाहतुकीचे नियम पाळून बाइक चालवू शकतो, पण लोक डोळ्यांनी बघूनही जाणूनबुजून अपघात घडवून आणतात. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळेच हे अपघात होतात". वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशानेच पोलीस विभागाने जादूगार आनंदची मदत घेतली होती.

जादूच्या कलेबाबत सरकार उदासीन : यावेळी जादूगार आनंद यांनी सांगितले की, "भारतीय आणि रशियन जादूगारांची संपूर्ण जगात वेगळी ओळख आहे. संपूर्ण जग भारतीय जादू किंवा रशियन जादू पाहण्यास उत्सुक असते. मात्र केंद्र सरकार असो की राज्य सरकार, त्यांनी याबाबत अजुनही काही पुढाकार घेतलेला नाही. आपण जादूच्या क्षेत्रात मिळून एक नवीन पिढी पुढे नेऊ शकतो. सरकारने कलेमध्ये जादूचा समावेश केला तर किमान 50 ते 100 लोकांना आपण या जादुई कलेत पारंगत करू शकतो. त्यांच्या माध्यमातून देशात पैसा येईल. हजारो कोटी डॉलर्स वर्ल्ड टूर मार्फत जादूगार आणू शकतात."

जादूच्या खेळाने रोजगार निर्मिती : जादूगार आनंद यांनी असेही सांगितले की, "आम्हाला देशाच्या संस्कृतीसाठी आणि समाजासाठी काम करायचे आहे. सरकारने मॅजिक अॅकॅडमी बनवायला हवी. त्याद्वारे येणाऱ्या पिढीत नवीन जादूगार तयार होतील. यामुळे लोकांची बेरोजगारीही काही प्रमाणात दूर होईल. एक छोटासा जादूगार सुद्धा त्याचा शो दाखवतो, मग त्याच्या टीममध्ये 8 ते 10 लोक सामील होतात. टीममध्ये सामील असलेल्या लोकांचे कुटुंब यामुळे सांभाळले जाते."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.