ETV Bharat / bharat

Wedding Shoot On Railway Station : तरुणांनो ऐका! 'या' रेल्वे स्थानकावर करता येईल तुम्हाला प्री-वेडिंग शूट...रेल्वेची खास ऑफर!

महाराष्ट्रात एकीकडे प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना तामिळनाडूत मात्र रेल्वेने एक भन्नाट योजना आणली आहे. रेल्वेने मदुराई रेल्वे स्थानकावर लग्नाच्या फोटोशूटला परवानगी दिली आहे. यासाठी रेल्वेने विविध ऑफर देखील दिल्या आहेत.

Wedding Shoot On Railway Station
रेल्वे स्टेशनवर लग्नाचे शूट
author img

By

Published : Jun 10, 2023, 8:50 PM IST

Updated : Jun 10, 2023, 9:00 PM IST

मदुराई : भारतीय रेल्वेच्या महसूल विभागाच्या वतीने विविध रेल्वे स्थानकांवर महसूल वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर चित्रपटाच्या शूटिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधित स्थानकांमध्ये रेल्वेला लक्षणीय उत्पन्न मिळत आहे.

Wedding Shoot On Railway Station
रेल्वेची ऑफर

5000 रुपये आकारून लग्नाचे फोटो काढता येणार : आता तामिळनाडू मध्ये रेल्वे स्थानकांवर लग्नाच्या शूटिंगसाठी किंवा जाहिरातदारांना फोटो काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मदूराई रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही योजना तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. रेल्वेने याचे शुल्क देखील निश्चित केले आहे. आता नवविवाहित जोडपे 5000 रुपये शुल्क आकारून दक्षिण रेल्वेच्या मदुराई विभागातील मदुराई रेल्वे स्थानकावर लग्नाचे फोटो काढू शकतात. तसेच त्यांना रेल्वेगाडीची पार्श्वभूमी हवी असल्यास 1500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

ट्विटरवर मार्गदर्शक तत्त्वांसह सूचना जाहीर : मदुराई विभागीय रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर याची माहिती दिली आहे. मदुराई विभागातील इतर रेल्वे स्थानकांसाठी याचे भाडे 3 हजार रुपये (अधिक एक हजार रुपये प्रति डबा) असेल. मदुराई रेल्वे स्थानकावर लग्नाचे फोटोशूट करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मदुराई विभागीय व्यवस्थापकाकडे तक्रार पाठवल्यानंतर मदुराई रेल्वे विभागीय प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वांसह ट्विटरवर ही सूचना जारी केली आहे.

तरुणांचा चांगला प्रतिसाद : मदुराई रेल्वे मार्गाव्यतिरिक्त, इतर रेल्वे स्थानकांवर वेडिंग शूटसाठी औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे अद्याप प्रकाशित केलेली नाहीत. अशा योजनांद्वारे, विवाहित जोडपे योग्य परवानगी घेतल्यानंतर त्यांचे फोटोशूट रेल्वे परिसरात करू शकतात. या घोषणेला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्रात मात्र प्री-वेडिंग शूटला विरोध! : तामिळनाडूमध्ये रेल्वेने प्री-वेडिंग शूटला समर्थन देत त्याद्वारे कमाईची योजना राबवली आहे, मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात याला विरोध केला जात आहे. प्री-वेडिंग शूट केल्यावर जर लग्न मोडलं तर तरुणीला ब्लॅकमेल केले जात असल्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघाने प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा :

  1. pre wedding shoot: प्री-वेडिंग शूटिंगवर बंदीची मागणी; 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य की लग्न मोडायला आमंत्रण'... वाचा काय आहे प्रकरण

Last Updated : Jun 10, 2023, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.