ETV Bharat / bharat

Controversy Over Kaali Documentary : काली मातेला सिगारेट पिताना दाखवणे आक्षेपार्ह.. 'काली'वर बंदी घालणार : मंत्री नरोत्तम मिश्रा

author img

By

Published : Jul 6, 2022, 11:28 AM IST

Updated : Jul 6, 2022, 12:23 PM IST

मध्यप्रदेशातील मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा ( Dr Narottam Mishra ) यांनी विवादास्पद माहितीपट असलेल्या काली वर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच मातेला सिगारेट पिताना दाखवणे आक्षेपार्ह असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचेही ते ( Controversy Over Kaali Documentary ) म्हणाले.

Minister Dr Narottam Mishra
मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा काली

भोपाळ ( मध्यप्रदेश ) : 'काली' या माहितीपटात काली मातेला सिगारेट ओढताना दाखवणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या प्रकरणी एफआयआर करण्यासाठी मी बोलणार असून मध्य प्रदेशात माहितीपटावर बंदी कशी घालायची याचा विचार केला जाईल. माहितीपटाचे पोस्टर तातडीने न हटवल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा ( Dr Narottam Mishra ) यांनी ( Controversy Over Kaali Documentary ) दिली.

सायबर सेलकडे तक्रार : चित्रपटकार लीना मनिमेकलाई ( Leena Manimekalai ) यांच्या आगामी माहितीपट ‘काली’च्या ( Kaali ) पोस्टरच्या रिलीजवरून वाद सुरू झाला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा हवाला देत चित्रपट निर्मात्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोस्टर आणि माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • डॉक्यूमेंट्री फिल्म 'काली' में काली माता को सिगरेट पीते हुए दिखाना काफी आपत्तिजनक है। इस मामले में FIR करवाने के लिए बोलूंगा और फिल्म मध्यप्रदेश में कैसे प्रतिबधिंत हो इस पर विचार किया जाएगा। अगर तत्काल फिल्म के पोस्टर नहीं हटाए तो आगे कड़ी कानूनी कार्रवाई करेंगे। pic.twitter.com/lTk7eNQXlF

    — Dr Narottam Mishra (@drnarottammisra) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डॉक्यूमेंट्री फिल्म 'काली' में काली माता को सिगरेट पीते हुए दिखाना काफी आपत्तिजनक है। इस मामले में FIR करवाने के लिए बोलूंगा और फिल्म मध्यप्रदेश में कैसे प्रतिबधिंत हो इस पर विचार किया जाएगा। अगर तत्काल फिल्म के पोस्टर नहीं हटाए तो आगे कड़ी कानूनी कार्रवाई करेंगे। pic.twitter.com/lTk7eNQXlF

— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) July 5, 2022

पोस्टर झाले व्हायरल : चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. हे पोस्टर ट्विट होताच व्हायरल झाले. लोक चित्रपट निर्मात्यावर आणि पोस्टरवर सतत टीका करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत गो महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी दिल्ली आयुक्त आणि गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे चित्रपट निर्मात्या लीना यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच पोस्टर्स आणि चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.

गुन्हाही दाखल : उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरला विरोध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. या संदर्भात लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यासह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टातही यासंदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : Controversy over documentary film kaali: डॉक्युमेंट्री फिल्म कालीच्या पोस्टरवरून वाद

भोपाळ ( मध्यप्रदेश ) : 'काली' या माहितीपटात काली मातेला सिगारेट ओढताना दाखवणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या प्रकरणी एफआयआर करण्यासाठी मी बोलणार असून मध्य प्रदेशात माहितीपटावर बंदी कशी घालायची याचा विचार केला जाईल. माहितीपटाचे पोस्टर तातडीने न हटवल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा ( Dr Narottam Mishra ) यांनी ( Controversy Over Kaali Documentary ) दिली.

सायबर सेलकडे तक्रार : चित्रपटकार लीना मनिमेकलाई ( Leena Manimekalai ) यांच्या आगामी माहितीपट ‘काली’च्या ( Kaali ) पोस्टरच्या रिलीजवरून वाद सुरू झाला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा हवाला देत चित्रपट निर्मात्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोस्टर आणि माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • डॉक्यूमेंट्री फिल्म 'काली' में काली माता को सिगरेट पीते हुए दिखाना काफी आपत्तिजनक है। इस मामले में FIR करवाने के लिए बोलूंगा और फिल्म मध्यप्रदेश में कैसे प्रतिबधिंत हो इस पर विचार किया जाएगा। अगर तत्काल फिल्म के पोस्टर नहीं हटाए तो आगे कड़ी कानूनी कार्रवाई करेंगे। pic.twitter.com/lTk7eNQXlF

    — Dr Narottam Mishra (@drnarottammisra) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोस्टर झाले व्हायरल : चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. हे पोस्टर ट्विट होताच व्हायरल झाले. लोक चित्रपट निर्मात्यावर आणि पोस्टरवर सतत टीका करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत गो महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी दिल्ली आयुक्त आणि गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे चित्रपट निर्मात्या लीना यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच पोस्टर्स आणि चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.

गुन्हाही दाखल : उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरला विरोध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. या संदर्भात लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यासह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टातही यासंदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : Controversy over documentary film kaali: डॉक्युमेंट्री फिल्म कालीच्या पोस्टरवरून वाद

Last Updated : Jul 6, 2022, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.