ETV Bharat / bharat

Tamil Nadu CM MK Stalin Meets PM : एम. के. स्टॅलिन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

author img

By

Published : Apr 1, 2022, 1:12 PM IST

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन दिल्लीतील द्रमुक कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. (Tamil Nadu CM MK Stalin Meets PM) स्टॅलिन तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी श्रीलंकन तमिळींचाहा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आहे.

एम. के. स्टॅलिन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दिल्ली - तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेले तमिळ नाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी गुरुवारी (दि. 31 मार्च)रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. (MK Stalin Meets PM) यावेळी त्यांनी श्रीलंकन ​​तमिळांना आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत देण्यासाठी केंद्राची मंजुरी मागितली आहे. दरम्यान, स्टॅलिन यांनी श्रीलंकेतील आर्थिक संकटाशी संबंधित मुद्द्यांसह पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर तपशीलवार निवेदन दिले.

मोहल्ला क्लिनिकची पाहणी करणार - तमिळ नाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत ते शुक्रवारी आज (दि 1 एप्रिल)रोजी सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी दोन्ही नेते भेटणार असून भेटीनंतर पाहणी करणार आहेत.

केंद्राने सहकार्य करावे - श्रीलंकन ​​तमिळांना भेडसावणाऱ्या अडचणींचा संदर्भ देताना ते म्हणाले, की त्यांच्यापैकी अनेकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. कारण त्यांना तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे राज्यातील संक्रमण शिबिरात ठेवण्यात आले आहे. तसेच, निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे राज्यात आणखी लोक येऊ शकतात. त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

बालकांना जीवनरक्षक उपाय म्हणून त्यांना मदत - सध्या, तामिळनाडू सरकार त्या देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्व भागात राहणाऱ्या श्रीलंकन ​​तमिळांना तसेच वृक्षारोपण क्षेत्रात काम करणाऱ्यांना, ज्यांना अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे, त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि जीवनरक्षक औषधे पुरविण्याची तयारी करत आहे. विशेषत: असुरक्षित गटातील महिला आणि बालकांना जीवनरक्षक उपाय म्हणून त्यांना मदत करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे.

सोनिया गांधी यांचीही भेट घेतली - केंद्राने सेवाभावी उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली, ज्यांचा पक्ष राज्यातील द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहयोगी आहे.

'वनक्कम' म्हणायला आले - दिल्लीत स्टॅलिनचे स्वागत करताना, सोनिया गांधी त्यांना संसदेतील (DMK)कार्यालयात भेटायला गेल्या. त्यावेळी सोनिया म्हणाल्या की मी स्टॅलिन यांना 'वनक्कम' म्हणायला आले होते. तसेच, 2 एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीत त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांना पुन्हा भेटू. स्टॅलिन यांनी सोनिया यांना शाल देऊन त्यांचे स्वागत केले.

2 एप्रिलला पक्ष कार्यालयाचे उद्घाटन - स्टॅलिन हे राष्ट्रीय राजधानीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते अनेक प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. पक्षाच्या खासदार कनिमोझी यांनी सांगितले, की द्रमुक 2 एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीत त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करत आहेत. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी भाजप आणि काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.

हेही वाचा - भारत-नेपाळ सबंध पूर्ववत होणार? नेपाळचे पतंप्रधान भारत दौऱ्यावर, मंदिरांना देणार भेटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.