मुंबई : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट टाकल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेट अंतर्गत त्याच्या संघातील हे पहिले प्रकरण आहे. लखनौ सुपर जायंट्सने बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. त्यावेळी कर्णधार केएल राहुलने स्लो ओव्हर टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर आता 12 लाख रुपयांचा दंड ठोठवण्याात आला आहे. या दंडाने कर्णधार केएल राहुलला चांगलाच झटका बसला आहे.
-
A brilliant final over from @Avesh_6 🔥🔥@LucknowIPL win by 10 runs to add two more points to their tally.
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/c6iEP6V7cN
">A brilliant final over from @Avesh_6 🔥🔥@LucknowIPL win by 10 runs to add two more points to their tally.
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
Scorecard - https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/c6iEP6V7cNA brilliant final over from @Avesh_6 🔥🔥@LucknowIPL win by 10 runs to add two more points to their tally.
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
Scorecard - https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/c6iEP6V7cN
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप : आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023 सामन्यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला स्लो ओव्हर-रेट ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. केएल राहुलला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलची आयपीएलमधील ही पहिली चूक आहे, ज्यासाठी त्याला शिक्षा झाली आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधारांवर दंड होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या स्लो ओव्हर रेटमुळे सूर्यकुमार यादवला दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला आयपीएल 2023 च्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या चौथ्या आयपीएल सामन्यात त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचेही पॉइंट टेबलमध्ये 8 गुण झाले आहेत. तसेच राजस्थान रॉयल्ससोबत समान गुण असूनही रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.