ETV Bharat / bharat

LPG Cylinder महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Nov 1, 2022, 8:02 AM IST

Updated : Nov 1, 2022, 8:14 AM IST

आज एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर झाले आहेत. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या महिन्याच्या १ तारखेलाही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात ( Gas Cylinder rate today ) करण्यात आली होती.

LPG Cylinder
एलपीजी सिलिंडर

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूच्या किमती सतत गगनाला भिडत होत्या. हे सर्व असतानाही गॅस सिलिंडरचे दर ( LPG Cylinders rate today ) कमी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.

राष्ट्रीय राजधानीत आजपासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ( LPG cylinder became cheaper ) 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये किमतीही कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ( commercial gas cylinder became cheaper ) कपात करण्यात आली होती. आजपासून एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

हे आहेत महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर दिल्लीत 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये आहे. पूर्वी गॅस सिलिंडरची किंमत 1859.5 रुपये होती. मुंबईत १८४४ रुपयामध्ये मध्ये व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होते. ते आता १६९६ रुपयांना मिळणार आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1893 रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी 2009.50 रुपये मोजावे लागत होते. आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1846 रुपये आहे. पूर्वी गॅस सिलिंडरची किंमत 1995.50 रुपये होती.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मघरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Last Updated : Nov 1, 2022, 8:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.