ETV Bharat / bharat

कर्नाटकातील 'अर्जुन' बैलाची चाहत्याने बनवली वॉल पेंटिंग - अर्जुन बैल वॉल पेंटिंग

कर्नाटकामधील हावेरी जिल्ह्यत लहान बैलांना घडवणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या बैलांचे बरेच चाहते येथे पाहायला मिळतात. जिल्ह्यात अनेक बैल आहेत ज्यांचे शेकडो चाहते आहेत. एका चाहत्याने त्याचा आवडता बैल असलेल्या अर्जुनची पेंटिंगच भिंतीवर बनवली आहे.

अर्जुन बैल
अर्जुन बैल
author img

By

Published : Jan 23, 2021, 7:23 AM IST

हावेरी(कर्नाटक) - सेलिब्रिटींना बरेच चाहते असतात. पण एक असा आहे जो ना अभिनेता आहे ना राजकारणी. पण त्याच्याकडे इतके चाहते आहेत की त्याची तुलना कोणत्याही अभिनेत्याशी किंवा राजकारण्यांशी केली जाऊ शकते. शेकडो चाहते त्याच्याकडे आकर्षित होतात. कोण आहे तो आणि एवढा मोठा चाहतावर्ग तयार करण्यासाठी त्याने काय केले ते पाहा....

कर्नाटकातील अर्जुन बैलाची चाहत्याने बनवली वॉल पेंटिंग

'अर्जुन 155' बंपर का बाप -

कर्नाटकामधील हावेरी जिल्ह्यत लहान बैलांना घडवणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या बैलांचे बरेच चाहते येथे पाहायला मिळतात. जिल्ह्यात अनेक बैल आहेत ज्यांचे शेकडो चाहते आहेत. एका चाहत्याने त्याचा आवडता बैल असलेल्या अर्जुनची पेंटिंगच भिंतीवर बनवली आहे. 'अर्जुन 155' नावाच्या या बैलाने हावेरीमध्ये बरंच नाव कमावले आहे.

लहान बैलांना घडवणारी स्पर्धा ही उत्तर कर्नाटकची एक लोककला आहे. स्पर्धा जिंकणाऱया बैलांची जिल्ह्यामध्ये अनेक चाहते आहेत. या बैलांचे हावेरी जिल्ह्यामध्येही हजारो चाहते आहेत. याच बैलांच्या यादीत अर्जुन या बैलाचा देखील समावेश होतो. त्याच्या चाहत्याने अर्जुनची भव्य वॉल पेंटिंगच बनवली आहे.

हावेरी जिल्ह्यातील बयाडगी तालुक्यातील हेडीगोंडा गावचा रहिवासी असलेल्या कलाकार फकीरेशने अर्जुनचे वॉल पेंटिंग काढत त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. या वॉल पेंटिंगनंतर फकीरेश यांनी जिल्ह्यातही बरेच नाव कमावले. बैलांप्रमाणेच त्यांची कलाही जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. अर्जुनची पेंटिंग बनवल्यानंतर त्यांना पेंटिंग बनवण्याच्या नवीन संधी मिळत आहेत.

हा बैल तामिळनाडू येथून दीड लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला होता. जेव्हा तो फक्त 18 महिन्यांचा होता. तेव्हापासून त्याला विविध स्पर्धांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय पोहणे, धावणे आणि खेळाचे इतर स्वरूप याबद्दलचे प्रशिक्षणही अर्जुनला देण्यात आले आहे. खास बनवलेले अन्न देत मालकांनी त्याला तंदुरुस्त आणि व्यवस्थित ठेवले आहे. याचा एक चाहता म्हणाला की, अर्जुनला आणल्यानंतर आता जिल्ह्यातील माझे शत्रू आमचे मित्र झाले आहेत.

अर्जुनने यापूर्वी शिवमोगा, दावणगेरे, गाडाग आणि धारवाड जिल्ह्यात बैलांना घडवणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. जिथं जिथं भाग घेतला त्या सर्व स्पर्धांमध्ये त्याने पुरस्कार जिंकले आहेत. गोवंश स्कायर स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक बैलांनाही अर्जुन हा दहशतीचा विषय बनला. पण खरोखर तो एक शांत बैल आहे. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांनी शरीरावर त्याच्या नावाचा टॅटूदेखील काढला आहे. त्यामुळे बैलांनाही मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग असतो हे पाहून आश्चर्य वाटायला नको.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.