पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या भेटीत राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबीसाठी रवाना झाले. मात्र फ्रान्समधून रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे मित्र तथा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेल्फी घेतला. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी हा फोटो फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॅप्शनसह ट्विटरवर शेअर केला. भारत आणि फ्रान्समधील मैत्री अजरामर असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लिहिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ट्विटला उत्तर देत फ्रेंड्स फॉरएव्हर असे लिहिले आहे. त्यामुळे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशातील मैत्री व्यक्त होत आहे.
-
Vive l’amitié entre l’Inde et la France !
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Long live the French-Indian friendship!
भारत और फ्रांस के बीच दोस्ती अमर रहे! pic.twitter.com/f0OP31GzIH
">Vive l’amitié entre l’Inde et la France !
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) July 14, 2023
Long live the French-Indian friendship!
भारत और फ्रांस के बीच दोस्ती अमर रहे! pic.twitter.com/f0OP31GzIHVive l’amitié entre l’Inde et la France !
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) July 14, 2023
Long live the French-Indian friendship!
भारत और फ्रांस के बीच दोस्ती अमर रहे! pic.twitter.com/f0OP31GzIH
दोन्ही देशासाठी ही भेट खूप फलदायी ठरली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सची भेट खूप फलदायी ठरल्याचे यावेळी स्पष्ट केले. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय आणि सेमीकंडक्टरसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची अपेक्षा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेली बातचीत खूप फलदायी ठरली. आम्ही भारत-फ्रान्स संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी विशेषतः मी उत्साहित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
द्विपक्षीय सहकार्यावर भर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. 'पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत एलिसी पॅलेसमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत संरक्षण, अंतराळ, नागरी, अणु, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, हवामान कृती, संस्कृती आणि लोक संबंध यासह द्विपक्षीय सहकार्यावर भर देण्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती दिली. जागतिक मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले.
बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी भारतीय सैन्य दलातील तिन्ही दलाच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. भारतीय जवानांनी बॅस्टिल डे परेडला सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा या गितावर परेड केली. भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व राजपुताना रायफल्ससह पंजाब रेजिमेंटने केले.
हेही वाचा -