सिकंदराबाद (तेलंगणा) - निवार चक्रीवादळाचा रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. तिरुअनंतपुरम ते कोरबा आणि अहमदाबाद ते चेन्नई या दोन लांब पल्ल्याच्या मार्गांवरील गाड्या शुक्रवारी दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी भाग निवार चक्रीवादळाने बाधित झाला आहे. त्यामुळे दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
तिरुअनंतपुरम ते कोरबा रेल्वे गाडी चेन्नई मध्य, अराकोणम, रेनिगुंटा आणि गुडूरमार्गे वळविण्यात आली आहे. अहमदाबाद - चेन्नई मध्य रेल्वे गुडूर, रेनिगुंटा आणि अरक्कनम मार्गे वळविण्यात आली आहे.
हेही वाचा - मेधा पाटकराचं शेतकऱ्यांसह ग्वाल्हेर महामार्गावर आंदोलन; दिल्लीकडे जाताना पोलिसांनी रोखले
हेही वाचा - मोफत पाणी आणि वीज.. हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध