नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी नितिश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे-पुढे पिंगा घालतात, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. नितिश कुमार यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी यांना विरोध केला होता. आत तेच मोदींच्या आशीर्वादासाठी व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळत आहे, असेही चिराग पासवान म्हणाले.
-
मात्र अपनी कुर्सी को बचाने के लिए व्याकुल बन प्रधानमंत्री के पीछे पीछे घूम रहे @NitishKumarजी की कुर्सी के प्रति चिंता दिखाती है।यह वहीं है जिन्होंने देश में 2014 में विकास के पहिए को रोकने के लिए @narendramodiजी के नाम का विरोध किया व आज प्रधानमंत्री जी की कृपा के लिए तरस रहे है
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मात्र अपनी कुर्सी को बचाने के लिए व्याकुल बन प्रधानमंत्री के पीछे पीछे घूम रहे @NitishKumarजी की कुर्सी के प्रति चिंता दिखाती है।यह वहीं है जिन्होंने देश में 2014 में विकास के पहिए को रोकने के लिए @narendramodiजी के नाम का विरोध किया व आज प्रधानमंत्री जी की कृपा के लिए तरस रहे है
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 3, 2020मात्र अपनी कुर्सी को बचाने के लिए व्याकुल बन प्रधानमंत्री के पीछे पीछे घूम रहे @NitishKumarजी की कुर्सी के प्रति चिंता दिखाती है।यह वहीं है जिन्होंने देश में 2014 में विकास के पहिए को रोकने के लिए @narendramodiजी के नाम का विरोध किया व आज प्रधानमंत्री जी की कृपा के लिए तरस रहे है
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 3, 2020
महागठबंधनची भीती दाखवत, नितिश कुमार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सत्ता काळात त्यांनी काय विकास केला, हे कोणालाच माहीत नाही. आता फक्त केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख करत आहेत. जनता दल (यू)ने राज्याचे मोठे नुकसान केले आहे, असे पासवान म्हणाले. तसेच बिहारच्या जनतेचा पैसा लुटणाऱ्या हिशोब द्यावा लागणार आहे. या सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करून सर्वांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असेही पासवान म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान -
बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा मंगळवारी पार पडला. यामध्ये 94 जागांवर सुमारे 1500 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. तर एकूण 53.51 टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 41 हजार 362 मतदान केंद्रांवर मतदान झाले.