लखनौ (उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौ येथील निवासस्थानाबाहेर शुक्रवारी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या सूचनेनंतर खळबळ उडाली आहे. बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बॉम्बविरोधी पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. पोलिसांचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती तपास करत आहे. मात्र, पोलिसांनी बॉम्बची माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे.
निवासस्थानाची सुरक्षाव्यवस्था वाढवली: लखनौचे डीसीपी सेंट्रल म्हणाले की, सीएम ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिल्ली मुख्यालयात देण्यात आली होती. त्यानुसार तात्काळ मुख्यमंत्री कार्यालय आणि परिसरात बॉम्बचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक तैनात करण्यात आले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी घेतली कसून झडती: लखनौ पोलिसांना दिल्ली नियंत्रण कक्षाकडून योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकासह मोठ्या संख्येने पोलिस दलाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची कसून झडती घेतली. पण काहीही आढळून आले नाही. गौतमपल्ली निरीक्षक सुधीर अवस्थी यांनी सांगितले की, सध्या ही माहिती खोटी असल्याचे स्पस्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसही म्हणाले माहिती खोटी: दिल्ली पोलिसांनीही ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. चौकशी केल्यावर कळले की, दिल्ली कंट्रोल रुमला अनेक राज्यांमध्ये एकाच भाषेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर लखनऊ पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौ येथील निवासस्थानी बॉम्ब असल्याची माहिती दिल्ली पोलीस मुख्यालयातील अज्ञात क्रमांकावरून आलेल्या कॉलमध्ये मिळाली होती.
अखेर ठरली अफवा: माहिती मिळताच इंटेलिजन्सपासून संपूर्ण पोलीस विभाग सतर्क झाला. LIU आणि पोलिस दल CS च्या निवासस्थानी पोहोचले. बॉम्ब निकामी करणारे पथकही पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक स्तरावरील तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती अफवा असल्याचे म्हटले आहे. यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता हा कॉल कुठून आला आणि कोणी केला याचा तपास गुप्तचर विभागाची पथके करत आहेत. स्थानिक पोलीसही आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहेत.