ETV Bharat / bharat

कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन - कोरोना कुठे लॉकडाऊन

दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील निर्बंध १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर तामिळनाडू, राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्ये सोमवारपासून दोन आठवड्यांचा लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटकने तर २४ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच केरळमध्येही शनिवारपासून नऊ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे..

LOCKDOWN ANT EXTESION DUE TO COVID
कोरोनाची दुसरी लाट : पाहा कोणकोणत्या राज्यांनी केलंय पूर्णपणे लॉकडाऊन
author img

By

Published : May 10, 2021, 11:23 AM IST

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या प्रसाराला आळा घालण्यासाठी कित्येक राज्यांनी कडक निर्बंध लागू केलेत, तर काही राज्यांनी सरळ लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, पाहूयात कोणत्या राज्याने कसे निर्बंध लागू केले आहेत.

दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील निर्बंध १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर तामिळनाडू, राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्ये सोमवारपासून दोन आठवड्यांचा लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटकने तर २४ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच केरळमध्येही शनिवारपासून नऊ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ७१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीसमवेत इतर सात राज्यांमधील आहेत. दहा राज्यांच्या या एकूण यादीमध्ये केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि हरियाणाचा समावेश आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी महाराष्ट्रात ८६४, तर कर्नाटकमध्ये ४८२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

पाहूयात राज्यनिहाय लॉकडाऊन :

  • दिल्ली : राजधानीमध्ये १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
  • उत्तर प्रदेश : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १७ मेपर्यंत वाढवली आहे.
  • हरियाणा : तीन मेपासून सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
  • बिहार : चार मे ते १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
  • ओडिशा : पाच मे ते १९ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
  • राजस्थान : १० मे ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून कडक निर्बंध लागू होते.
  • झारखंड : लॉकडाऊन सदृश्य निर्बंधांना १३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत. २२ एप्रिलपासून हे निर्बंध लागू करण्यात आले होते.
  • छत्तीसगड : वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन वाढवण्याची परवानगी दिली होती.
  • पंजाब : १५ मेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू आहे. याशिवाय इतर निर्बंधही लागू आहेत.
  • चंदीगढ : वीकेंड लॉकडाऊन लागू आहे.
  • मध्य प्रदेश : राज्यात १५ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत.
  • गुजरात : रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तर ३६ शहरांमध्ये १२ मेपर्यंत दिवसाही संचारबंदी लागू आहे.
  • महाराष्ट्र : पाच एप्रिलपासूनच कडक निर्बंध लागू. आंतरजिल्हा प्रवासासाठी निर्बंध लागू. हे निर्बंध वेळोवेळी वाढवण्यात आले. सध्या १५ मेपर्यंत हे निर्बंध लागू आहेत. कित्येक जिल्ह्यांनी स्वतःपुरते लॉकडाऊन लागू केले आहेत.
  • पश्चिम बंगाल : मागील आठवड्यापासून कडक निर्बंध लागू आहेत.
  • आसाम : सायंकाळी सहा वाजेपासून रात्रीची संचारबंदी लागू. बुधवारपासून सार्वजनिक स्थळांवर जाण्यास बंदी.
  • नागालँड : ३० एप्रिल ते १४ मेपर्यंत कडक निर्बंधांसह अंशतः लॉकडाऊन.
  • मिझोराम : १० मे ते १७ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू.
  • अरुणाचल प्रदेश : शनिवारपासून सायंकाळी साडे सहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी.
  • मणिपूर : सात जिल्ह्यांमध्ये आठ मेपासून १७ मेपर्यंत रात्रीची संचारबंदी.
  • सिक्कीम : १६ मेपर्यंत लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लागू.
  • उत्तराखंड : ११ मे ते १८ मेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • हिमाचल प्रदेश : सात मे ते १६ मेपर्यंत कोरोना कर्फ्यू लागू आहे.
  • केरळ : आठ मे ते १६ मेपर्यंत लॉकडाऊन लागू.
  • तामिळनाडू : १० मे ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे.
  • पुद्दुचेरी : १० मे ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय.
  • तेलंगणा : रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी. मास्कची सक्ती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.