ETV Bharat / bharat

Liquor smuggling in Cylinder : दारुबंदी असताना बिहारमध्ये तस्करीचा अजब नमुना; पोलीसही झाले हैराण

राजधानी पाटण्यात दारू तस्करीचा नवा जुगाड पाहायला मिळाला आहे. घरगुती सिलेंडरमध्ये देशी दारूची ( Liquor smuggling through cylinder ) तस्करी केली जात होती. याप्रकरणी गुप्त माहितीवरून पीरबहोर पोलिसांनी 50 लिटर देशी दारूसह आरोपीला अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी.

गॅस सिलिंडरमधून दारू तस्करी
गॅस सिलिंडरमधून दारू तस्करी
author img

By

Published : Apr 13, 2022, 4:48 PM IST

पाटणा - बिहारमध्ये दारूबंदी ( Liquor Ban In Bihar ) लागू झाली आहे. असे असतानाही दारू तस्करीची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. दारू तस्कर तस्करीसाठी आरोपी रोज नवनवीन युक्त्यांचा वापर करताना दिसतात. राजधानी पाटनामध्ये दारू तस्करीचा नवा जुगाड पाहायला मिळत आहे. घरातील तळघरात ठेवलेल्या स्वयंपाकघराच्या सिलिंडरमध्ये दारूचा साठा ( Liquor Smuggling In Patna ) केला जात आहे. या प्रकरणी पिरबहोर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली आहे.

पोलिसांनी सिलिंडरमधून आणण्यात येणारी देशी दारू जप्त केली आहे. देशी दारूची खेप सबलपूर डायरा येथून पाटण्याला आणली जात होती. पोलिसांनी सुमारे 50 लिटर देशी दारूचा साठा जप्त केला आहे. तसेच, या प्रकरणात एका तस्कराला अटक ( Liquor Smuggler Arrested In Patna ) करण्यात आली आहे.

गॅस सिलिंडरमधून दारू तस्करी

पाटणामध्ये सिलिंडरमधून दारूची तस्करी - पीरबाहोर पोलिस स्टेशनचे प्रभारी सबीहुल हक यांनी सांगितले की, दारू माफियांची ही अनोखी पद्धत पाहून पोलिस दलही हैराण झाले. दारू तस्कर भूषण राय व दारू माफिया भोली राय यांच्या सांगण्यावरून, तळघरात सिलिंडरचा साठा करण्यात येत होता. देशी दारूचा साठा सबलपूर डायरा येथून पाटण्यापर्यंत बोटीने नेण्याचे काम करण्यात येत होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. भूषण राय याच्याकडून ५० लिटर देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सबलपूर डायरा येथून देशी दारूची तस्करी - स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, सबलपूर डायरा येथील काही दारू माफिया सातत्याने बोटीतून पाटण्याला देशी दारू पाठवत असल्याची गुप्त माहिती अनेक दिवसांपासून मिळत होती. मंगळवारी पीरबहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदम घाट येथे बोट स्वार भूषण राय याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून भारत पेट्रोलियमच्या 7 सिलेंडरमधून 14 लिटर देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा-मोखाडा येथे अवैध दारू जप्त, 31 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात

हेही वाचा-संचारबंदीतही लग्नाच्या कारमध्ये दारू तस्करी करणारे दोन जण ताब्यात; कारसह 55 हजार रुपयांची दारु जप्त

हेही वाचा-अजब शक्कल.. रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी; दोन आरोपीसह दारू, रुग्णवाहिका जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.