आजपासू गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार
देशाला आज स्वदेशी बनावटीची तिसरी हायस्पीड ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज शशी थरुर, दिग्विजय सिंग नामांकन अर्ज भरणार
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार आहेत. आज काँग्रेसच्या ध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा होणार
'मी वसंतराव देशपांडे' या सिनेमासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर 'अवांछित', 'गोदाकाठ'साठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात येईल. जून सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. अजय देवगणला तान्हाजी सिनेमासाठी पुरस्कार देण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धुळ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सैनिक लॉन्समध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित रहाणार आहेत.

आज नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर
केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत. ते पुण्यातील चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार आहे.
Important events of the country in one click