पंतप्रधान आजपासून दोन दिवसाच्या सूरत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या सूरत आहेत. यावेळी विविध योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मोदी सकाळी 8.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील.
अशोक गेहलोत आज घेणार सोनिया गांधींची भेट
अशोक गेहलोत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राजस्थानच्या राजकीय पेचप्रसंगावर काही तोडगा निघेल का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी गेहलोत रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले आहेत.
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान उद्या घेणार सीडीएसचा पदभार
लेफ्टनंट जनरल ( निवृत्त ) अनिल चौहान यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( CDS ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते देशाचे दुसरे सीडीएस आहेत. पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर जवळपास नऊ महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी एक निवेदन जारी करून लेफ्टनंट जनरल चौहान यांची सीडीएस म्हणून नियुक्तीची घोषणा केली.
अमेरिका युक्रेनला एक अब्ज डॉलर्सची अत्याधुनिक शस्त्रे देणार
वॉशिंग्टन : युक्रेनला अमेरिकेने $1.1 अब्ज डॉलरची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची असेल. पॅकेजमध्ये रॉकेट लाँचर, ड्रोन स्ट्राइक शस्त्रे असतील.
महाराष्ट्र सरकार देणार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठी भेट
राज्य सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. आता महाराष्ट्र सरकार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 50 हजार रुपये देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. 2011 मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. ती आत वाढवण्यात येणार आहे.
तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचा शालू
तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार आहे. मिलिंद नार्वेकर हे आज अंबाबाईला तिरुपतीचा शालू घेऊन येणार आहेत.
राज्यसभेचे खासदार दिग्विजय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्याता
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनीही उतरण्याची तयारी चालविली आहे.
Important events of the country in one click