मेरठ - जिल्ह्यात एक शावक मागील काही दिवसांपासून आपल्या आईपासून दूर झाला आहे. वन विभागाचे पथक दिवसरात्र त्या मादी बिबटला शोधणअयाचा प्रयत्न करत आहे. वन विभागच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो शावक दो ते तीन आठवड्याचे असेल. वन विभागाचे पथक लहान बाळाच्या बाटलीने दूध पाजून त्याचा सांभाळ करत आहे.
काही दिवसांपूर्वी उसाच्या शेतात शेतकऱ्यांना एक शावक सापडला होता. शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने शावकाला ताब्यात घेतले असून त्याच्या आईला शोधण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्यांच्या गंधामुळे मादी बिबट आपल्या शावकाजवळ येत नाही. वन विभागाचे पथकाने सांगितले की त्याची आई जवळ आली पण पिल्लूला न घेताच परत गेली. डीएफओ राजेश कुमार म्हणाले, मादी बिबटचा शोध सुरू आहे. शावक इतका लहान आहे की त्याला जंगलातही सोडले जाऊ शकत नाही. जंगलात सोडले तर इतर जंगली प्राणी त्याचा शिकार करण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Two Men Get Married : दारूच्या नशेत दोन दारुड्यांनी केले एकमेकांशी लग्न.. अन् झालं असं काही..