बेंगळुरू: अत्याधुनिक मोबाईल टॅब आणि लॅपटाॅपच्या बाजारात कायम नवनविन अविष्कार आणि आकर्षक सोयी सुविधा दिल्या जातात. नव तरुण आणि त्यांच्या वापर कर्त्यांमधे अशा नविन अत्याधुनिक फिचर्सच्या वस्तु घेण्याची क्रेझ असते. ते बाजारात नविन काय आले आहे. त्याचे फिचर्स काय आहेत. कोणत्या नव्या प्राॅडक्ट्स मधे नविन काय मिळेल याचा शोध घेत असतात. जागतिक ब्रॅंड असलेल्या लेनोवो ने शुक्रवारी भारतात 11 इंट टचस्क्रीन असलेला पहिला प्रीमियम 5 जी अँड्रॉइड टॅबलेट लॉन्च केला आहे.
लेनोवो ने या नव्या टॅबच्या लाॅंचच्या निमित्ताने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, हा टॅब पी11 5जी आहे. यात 256 आणि 128 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात तो उपलब्द आहे. 256 जीबी स्टोरेजच्या टॅबची किंंमत 34 हजार 999 कप 128 जीबी स्टोरेजच्या टॅबची किंमत 29 हजार 999 रुपये आहे. नवीन टॅबलेट सब 6 गिझाहर्ट 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो. जो वापरकर्त्याला हायब्रीड काम, शिक्षण आणि मनोरंजनासाठी उपयोगाचा आहे. तसेच यावर हाय स्पीड कनेक्टिव्हिटीचा आनंदही घेऊ शकतात.
नव्या लेनोवो टॅबलेटच्या वैशिष्ट्यांनुसार, डिव्हाइसच्या स्लॉटद्वारे 5G मायक्रो सिम टाकून 5G सेवा वापरता येऊ शकते. हे वापरकर्त्यांना फ्रंट कॅमेरा सेन्सर आणि बॅकग्राउंड ब्लरद्वारे हँड्स-फ्री लॉगिनसह रिअल-टाइममध्ये व्हिडिओ चॅटची सुविधा देण्यात आली आहे. ज्याचा वापरकर्ते चांगला वापर करु शकतात आणि यात वापरकर्त्याची गोपनीयता पण संभाळली गेली आहे. यात उच्च कार्यक्षमतेसाठी स्नॅपड्रॅगन 750G, 5G मोबाइल प्लॅटफॉर्म प्रोसेसर आणि 12 तासांपर्यंत नॉन-स्टॉप व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी 7700 mAh बॅटरी क्षमता आहे ज्यामुळे वापरर्त्याला टॅब वापराचा चांगला अनुभव घेता येतो.
नव्या टॅब मधे डोळ्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, टॅबलेटला 11-इंच 2K IPS टचस्क्रीन देण्यात आला आहे. सोबतच डॉल्बी व्हिजनने उत्कृष्ट गुणवत्तेसह वाढ करण्यात आली आहे डॉल्बी मुळे स्थानिक ऑडिओत क्रांती केली आहे. याशिवाय, टॅब पी 11 चा डिस्प्ले वापरकर्त्यांना डोळ्यांचे संरक्षण देण्यासाठी TUV Rheinland द्वारे प्रमाणित केलेला आहे. लेनोवो जलद कनेक्टिव्हिटी, अधिक क्षमता, अति-कमी विलंबता आणि त्यांच्या उत्पादनाची सुधारित विश्वासार्हता सक्षम करण्यासाठी 5G तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती लेनोवो ने दिली आहे.