वॉशिंग्टन : आर्थिक जागतिक पातळीवर सध्या अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन ई कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तारीत आहे का असा प्रश्न पडला आहे. याचे कारण म्हणजे 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. अॅमेझॉनने बुधवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे कर्मचारी कपात करणार असल्याचं सांगितले आहे.( Amazon to layoff 18 thousand employee )
-
Amazon to layoff over 18,000 employees citing economic uncertainty
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/U4r3YuTpR1#Amazon #layoff #employees #AndyJassy #Economy #Employment pic.twitter.com/eloVNAIjv8
">Amazon to layoff over 18,000 employees citing economic uncertainty
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2023
Read @ANI Story | https://t.co/U4r3YuTpR1#Amazon #layoff #employees #AndyJassy #Economy #Employment pic.twitter.com/eloVNAIjv8Amazon to layoff over 18,000 employees citing economic uncertainty
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2023
Read @ANI Story | https://t.co/U4r3YuTpR1#Amazon #layoff #employees #AndyJassy #Economy #Employment pic.twitter.com/eloVNAIjv8
10 हजार कर्मचारी कामावरून काढले : सीईओ अँडी जेसी ( CEO Andy Jesse ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आम्ही जे जाहीर केले त्यानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे. जवळपास 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. 2022 नोव्हेंबरमध्ये अमेझॉनने जवळपास 10 हजार कर्मचारी कामावरून काढले होते.अमेझॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ( The biggest staff cut ) असल्याचे सांगितले जात आहे. आतार्यंत 15 लाख कर्मचारी अमेझॉनसोबत काम करत होते. त्यापैकी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढण्यात आले. आता पुन्हा 18 हजार कर्मचाऱ्यांना काढले ( Amazon lays off 18,000 jobs ) जाणार आहे.
निश्चित अर्थव्यवस्थेमुळे कर्मचारी कपात : जॅसी यांनी नोटमध्ये म्हटले आहे की वार्षिक नियोजन अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे अधिक कठीण झाले आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे. अॅमेझॉनमध्ये वेअरहाऊस कर्मचार्यांसह १५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात.अॅमेझॉनने आधी १० हजार नोकरकपातीचे लक्ष्य ठेवले होते. नोव्हेंबरपासून ही नोकरकपात सुरु आहे. दरम्यान,अॅमेझॉन इंकने मंगळवारी जाहीर केले की त्यांच्या ई-कॉमर्स कंपनीला ८ अब्ज डॉलर कर्ज पुरवठा करण्यासाठी काही कर्जपुरवठादारांशी करार केला आहे. यातून मिळणारे पैसे कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील. वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च कमी केला आहे. याचा फटका ॲमेझॉनच्या व्यवसायाला बसला आहे.
सेल्सफोर्समध्ये १० टक्के नोकरकपात : केवळ ॲमेझॉनच नाही, तर अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स इंकने (Salesforce Inc) बुधवारी सांगितले की पुनर्रचनेचा एक भाग म्हणून सुमारे १० टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्याची त्यांची योजना आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की त्यांना आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागत आहे. कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.