मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना सोबकच निमोनियाची लक्षणे दिसून आली. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आणखीन काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत सामधानी यांनी 'इटीव्ही भारत'शी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की, डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी घेत आहे. मात्र त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन देखील त्यांनी लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना केले आहे.
लता मंगेशकर यांची 8 जानेवारी ला कोरोना चाचणी करण्यात आली होती. दहा जानेवारीला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आला. त्यामुळे घराशेजारील बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.