गांधीनगर - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर अंकलेश्वर या मूळगावी अंत्यसंस्कार पार पडले. राहुल गांधी त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी भरूच येथे पोहचले होते.
ऑक्टोबरमध्ये झाली होती कोरोनाची लागण -
अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती.
-
Gujarat: Rahul Gandhi reaches Bharuch to pay his last respects to deceased Congress leader Ahmed Patel
— ANI (@ANI) November 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Patel passed away on November 25 pic.twitter.com/vJVxUN7Km2
">Gujarat: Rahul Gandhi reaches Bharuch to pay his last respects to deceased Congress leader Ahmed Patel
— ANI (@ANI) November 26, 2020
Patel passed away on November 25 pic.twitter.com/vJVxUN7Km2Gujarat: Rahul Gandhi reaches Bharuch to pay his last respects to deceased Congress leader Ahmed Patel
— ANI (@ANI) November 26, 2020
Patel passed away on November 25 pic.twitter.com/vJVxUN7Km2
एक निष्ठावान सहकारी आणि मित्र गमावला -
'श्री अहमद पटेल यांच्या रुपाने मी एक असा सहकारी गमावला आहे, ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य काँग्रेसला समर्पित केले होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा निष्ठावान सहकारी आणि मित्र मी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, या कठीण काळात मी त्यांच्यासोबत उभी आहे' अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे.