ETV Bharat / bharat

चांद्रयानासाठी शेवटची १५ मिनिटे धोक्याची, जाणून घ्या २०१९ मध्ये काय झाले होते?

author img

By

Published : Aug 22, 2023, 5:12 PM IST

चांद्रयान ३ मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शेवटची १५ मिनिटे. या दरम्यान यानाचा वेग नियंत्रित केला जातो आणि लँडर आडव्या स्थितीतून चंद्राच्या बरोबर काटकोनात उभे करावे लागते. त्यासाठी इंजिन सुरू करुन लँडरला दिशा द्यावी लागते. २०१९ च्या मोहिमेत याच टप्प्यात चूक झाली होती. (what happened to Chandrayaan 2)

Chandrayaan 3
चांद्रयान

नवी दिल्ली : चांद्रयान ३ इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. सुमारे ४० दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर बुधवारी संध्याकाळी त्याचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग नियोजित आहे. या संपूर्ण मिशनमध्ये शेवटची १५ मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत. मिशनचा हा अत्यंत नाजूक टप्पा मानला जातो.

अत्यंत महत्वाची शेवटची 15 मिनिटे : तुम्हाला आठवत असेल की, २०१९ मध्ये इस्रोचे चांद्रयान 2 जवळजवळ यशस्वी झाले होते. मात्र शेवटच्या क्षणी हार्ड लँडिंगमुळे यान क्रॅश झाले. आता तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी इस्रोने चोख तयारी केलीय. त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी याचे वर्णन 'दहशतीची 15 मिनिटे' असे केले होते. या 15 मिनिटांत सुमारे 100 किलोमीटर अंतर कापावे लागते आणि वेगावरही नियंत्रण ठेवावे लागते. अशावेळी वेग नियंत्रित करणे आणि लँडरला उभ्यास्थितीत उतरवणे हे मोठे आव्हान असते.

इस्रोने चुका दुरुस्त केल्या : 100 किमी नंतर, जेव्हा 30 किमी अंतर बाकी राहते, तेव्हा यानाचे रॉकेट प्रज्वलित करण्यात येते. ते लँडरला उभ्या स्थितीत ठेवते. जेणेकरून ते त्याच दिशेने पृष्ठभागावर उतरू शकेल. अन्यथा लँडर पलटू शकते. येथून पुढे वेगवेगळे टप्पे आहेत. यासाठी शेवटचे 800 मीटर खूप महत्वाचे आहेत. 2019 च्या चांद्रयान 2 मोहीमेत यान चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले होते. मात्र मॉड्यूलमधील समस्येमुळे ते मिशन पूर्ण होऊ शकले नाही. यावेळीही हा त्रास होऊ शकतो का? यावर इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्टीकरण दिलंय. 'यावेळी आम्ही पूर्ण तयारी केलीय. गेल्यावेळी आमच्यासोबत जे काही अनवधानाने घडले, ते दुरुस्त करण्यात आले असून त्यावर लक्ष ठेवलं जातंय, असे ते म्हणाले.

चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी : आता तुम्हाला समजले असेल की लँडिंगची प्रक्रिया इतकी अवघड का आहे. चंद्रावर वातावरण नाही. तेथील गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी आहे. जोपर्यंत चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येत नाही तोपर्यंत ते बूस्टरच्या मदतीने नियंत्रणात ठेवले जाते. पण एकदा ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आलं की त्याची गती नियंत्रित करणे खूप आव्हानात्मक असते. चंद्रावर लँडिंग पॅराशूटच्या मदतीने करावे लागते. या दरम्यान लँडरचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो. वेग नियंत्रित न केल्यास हार्ड लँडिंग होते आणि हार्ड लँडिंगमध्ये लँडर नष्ट होण्याचा धोका असतो.

शेवटच्या टप्प्यात सर्वकाही ऑटोफेड असते : लँडरचा वेग नियंत्रित करण्यासाठी त्यात रॉकेट बसवले आहे. रॉकेट प्रज्वलित झाल्यानंतर, ते लँडरचा वेग नियंत्रित करते. यामुळे लँडरचे सॉफ्ट लँडिंग होते. सध्या इस्रोच्या कंट्रोल रूममधून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवलं जातंय. शेवटच्या टप्प्यात सर्वकाही ऑटोफेड असतं. त्यावेळी ना बुस्टरद्वारे मदत घेता येत, ना दिशा बदलता येत. लँडिंगचे प्रोग्रामिंग आधीच केले गेले आहे. त्यानुसारच ते आपले काम करेल.

रशियाचे लुना 25 क्रॅश झाले : इस्रोने मंगळवारी चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगबाबत ताजे अपडेट दिलेत. 'मिशन शेड्यूलवर असून सिस्टमची नियमित तपासणी केली जात आहे, असे इस्रोने सांगितले'. इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांद्रयान ३ चे ऑपरेशन सुरळीत सुरू असून इस्रोच्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रशियाचे लुना 25 हे अंतराळयान 20 ऑगस्टला चंद्रावर क्रॅश झाले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.

  • Chandrayaan-3 Mission:
    The mission is on schedule.
    Systems are undergoing regular checks.
    Smooth sailing is continuing.

    The Mission Operations Complex (MOX) is buzzed with energy & excitement!

    The live telecast of the landing operations at MOX/ISTRAC begins at 17:20 Hrs. IST… pic.twitter.com/Ucfg9HAvrY

    — ISRO (@isro) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Chandrayaan-3 : चांद्रयान-३ चंद्राच्या अगदी जवळ; 23 ऑगस्टला करणार लँडिंग
  2. Chandrayaan 3 : चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे एवढे अवघड का? जाणून घ्या
  3. Chandrayaan 3 : चंद्रावर कोणत्याही परिस्थितीत 23 ऑगस्टलाच करावे लागेल सॉफ्ट लँडिंग, अन्यथा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.