पणजी (गोवा) - छत्रपती शिवरायांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे चिखली ( Statue of Shivaji Maharaj Unveil chikhali pramod sawant ) येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अनावरण झाले. मुरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj statue chikhali Goa ) स्मारक समितीने हा पुतळा स्थापन केला असून, याची उंची 23 फूट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न झाला.
हेही वाचा - Video : 'ही' व्यक्ती 40 वर्षांपासून खात आहे वाळू.. तरीही प्रकृती आहे एकदम ठणठणीत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा गोव्यातील मुरगाव येथे उभारण्यात आला आहे. 23 फुटी उंच असणाऱ्या या पुतळ्याचे अनावरण शिवराज्याभिषेक दिनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून हिंदू समाजाच्या वतीने देशातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी करण्यात आले.
पोर्तुगिज साम्राज्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रखर लढा दिला होता. म्हणूनच पोर्तुगिजांपासून गोवा सुरक्षित राहिला. हिच भावना गोवेकरांच्या मनाशी आजही घट्ट बांधून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यावर असलेले उपकार आणि त्यांनी पोर्तुगिजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी केलेली सुरुवात, यामुळे गोवेकर नेहमीच राजांचे ऋणी असल्याचे सावंत आपल्या भाषणात म्हणाले. आगामी शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाविष्ट करणार असल्याचेही सावंत म्हणाले.
हेही वाचा - कुपवाडा जम्मू काश्मीरच्या चकतरा कंडी क्षेत्रामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार