ETV Bharat / bharat

Lalu Prasad Yadav on INDIA Alliance : देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी अहंकार सोडून एकत्र यावं - लालू प्रसाद यादव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:52 PM IST

Lalu Prasad Yadav on INDIA Alliance आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा ठपका यादव यांनी मोदी सरकरवर ठेवला आहे. तसंच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकावर टीका केली आहे.

Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav

मुंबई Lalu Prasad Yadav on INDIA Alliance : राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच त्यांनी इंडिया आघाडीचा भाग असलेल्या विरोधी पक्षांनी अहंकार सोडून एकत्र याव असं अवाहन देखील केलं. देशाची लोकशाही संविधान वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

मोदी सरकार अपयशी : "देशाचं रक्षण, गरिबी, वाढत्या महागाईविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची स्थिती, देशातील बाढती बेरोजगारी, महिला आत्याचार मुद्यांवर विरोधकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, असं लालू प्रसाद यादव म्हणाले. तसंच त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे.

निवडणुका एकत्र लढण्याची गरज : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संविधान, लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला आपला अहंकार बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज आहे. 2024 लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याची गरज आहे, असं यादव म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिराला भेट : आदल्या दिवशी लालू प्रसाद यादव यांनी त्यांची मुलगी मिसा भारती यांच्यासोबत मध्य मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमध्ये गेल्या ऑगस्टमध्ये महागठबंधन सत्तेवर आले. लालू प्रसाद यादव, जनता दल (युनायटेड) नेते तसंच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतलाय.

फूट पाडणाऱ्यांना प्रत्युत्तर देणार : "आम्ही तिसर्‍यांदा इंडिया आघाडीमुळं मुंबईत भेटत आहोत," लोकांना योग्य पर्याय हवा होता, तो पर्याय इंडिया आघाडी देत आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांना देशातील जनता चोख प्रत्युत्तर देईल. इंडिया आघाडी म्हणुन आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर लोक आम्हाला माफ करणार नाहीत, असं देखील तेजस्वी यादव म्हणाले.

हेही वाचा -

  1. Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
  2. Rules Change From 1st Sept 2023 : 1 सप्टेंबरपासून पगारवाढ, नविन नियम लागू
  3. Rahul Gandhi Press Conference : अदानींच्या गुंतवणुकीत खरा पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.