आसाम: आसाममधील लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांचा नागाव जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे 2.30 च्या सुमारास जुनमोनी यांच्या कारची कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर आसाममध्ये खळबळ उडाली आहे.
अपघाताच्या एक दिवस आधी लखीमपूर पोलीस ठाण्यात एसआय जुनमोनी राभा यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुनमोनी राभाने नागावमध्ये बनावट सोन्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणानंतर त्यांनी पथकासह लखीमपूर येथील अजगर अली नावाच्या व्यक्तीला अटक केली. हा आरोपी बनावट सोन्याच्या रॅकेटचा कथित सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. अजगर अलीच्या अटकेनंतर लगेचच, त्याची आई अमिना खातून यांनी जुनमोनी राभाविरुद्ध खंडणीची तक्रार केली होती. मुलाला सोडण्यासाठी जुनमोनी यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे आरोपीच्या आईने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर नागाव पोलीस आणि लखीमपूर पोलिसांनी एसआय जुनमोनी यांच्याविरोधात चौकशी सुरू केली. मात्र जुनमोनी राभा यांचा रस्ते अपघातात अचानक मृत्यू झाला.
16 मे 2023 रोजी जुनमोनी राभा यांचा मृत्यू झाला - जुनमोनी राभा यांच्या मृत्यूची समाजातील विविध घटकांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, तपास सीआयडी आसामकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला-आसामचे डीजीपी जीपी सिंग
जुनमोनीचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप जुमोनी यांच्या आईने केला आहे. एसपी लीना डोले यांच्या नेतृत्वाखालील नागाव पोलिसांच्या पथकाने जुनमोनी यांच्या घरावर छापा टाकून काही रक्कम जप्त केली होती. जुनमोनी राभाचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचेही नेटिझन्समध्ये चर्चा सुरू आहे. यापूर्वी जुनोमी राभा यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले होते. तिचा होणारा पती राणा पगाग याच्यासोबत फसवणुकीच्या प्रकरणात तिचा सहभाग असल्याचादेखील आरोप आहे.
हेही वाचा-
World Hypertension Day 2023 : उच्च रक्तदाब घेत आहे घातक रूप, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी