हापुड (उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी ( Lady Don Threatened To Kill CM Yogi ) मिळाली आहे. एका लेडी डॉन नावाच्या ट्विटर हॅंडलवरून त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हापूड पोलिसात गुन्हा दाखल -
भाजपचे अनेक प्रसिद्ध चेहरे हे शत्रूंच्या निशाण्यावर आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांचेही नाव आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ( Threatened To Kill Yogi Adityanath ) दिल्याची बातमी ट्विटर हँडलवरून समोर आली आहे. लेडी डन नावाच्या ट्विटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सध्या हापुड पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.