ETV Bharat / bharat

सीईओ महिलेकडून बाळाचा खून ; मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झाली 'ही' धक्कादायक माहिती - मुलाचा मृत्यू

Lady CEO Killed Child : चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यात खून केल्यानंतर कर्नाटकात मृतदेह नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मारेकरी मातेला गोव्यातील म्हापसा न्यायालयानं सहा दिवसाची कोठडी ठोठावली आहे. दरम्यान या चिमुकल्याचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

Lady CEO Killed Child
संग्रहित छायाचित्र
author img

By PTI

Published : Jan 10, 2024, 10:23 AM IST

बंगळुरू Lady CEO Killed Child : कंपनीची सीईओ असलेल्या सूचना शेठ या महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यातील हॉटेलमध्ये खून केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर मातेनं गोव्यात चिमुकल्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन गोव्यावरुन कर्नाटकमध्ये प्रवास केला होता. या प्रकरणी मुलाच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचा अहवाल दिला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार नाईक यांनी हा अहवाल दिला आहे.

तोंड आणि नाक दाबल्यानं झाला मृत्यू : गोव्यातून मुलाचा मृतदेह टॅक्सीतून नेणाऱ्या या महिलेला चित्रदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी पकडलं होतं. यावेळी पोलिसांनी महिलेच्या सुटकेसची तपासणी केली असता, त्यात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी पोलिसानी महिलेला अटक केल्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानं झाल्याचा अहवाल दिला आहे. यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर कुमार नाईक यांनी " तोंड आणि नाक दाबल्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला असावा. त्यासाठी मारेकरी महिलेनं कापड किंवा उशीचा वापर केला असावा. हातानं गळा आवळून खून झाला असेल, असं वाटत नाही" असंही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.

घटनेची माहिती मिळाल्यानं जकार्तावरुन परतले वडील : चार वर्षाच्या चिमुकल्याचा आईनं खून केल्याची घटना कळताच चिमुकल्याचे वडील व्यंकट रमण हे चित्रदुर्ग इथं जकार्तावरुन परतले. त्यांनी मंगळवारी संध्याकाळी चित्रदुर्ग इथं धाव घेतली. व्यंकट रमण यांनी चिमुकल्या मुलाचं शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांना परवानगी दिली. चिमुकल्या मुलाचा आईनंच खून केल्याची घटना घडल्यानं त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे.

मारेकरी मातेला सहा दिवस पोलीस कोठडी : चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून करणाऱ्या सीईओ सूचना सेठ या महिलेनं गोव्यात मुलाची हत्या करुन मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीनं कर्नाटक राज्यात नेला होता. गोवा पोलिसांनी आरोपी सूचना सेठला सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली. त्यानंतर मंगळवारी गोव्यात आणण्यात आलं असून म्हापसा शहरातील न्यायालयानं तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. या चिमुकल्या मुलाच्या खुनाचं कारण अद्यापही समोर आलं नसल्याचं यावेळी या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. सीईओ महिलेकडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यात खून; मृतदेह सुटकेसमध्ये भरुन गेली कर्नाटकात
  2. अमरावती : दीड महिन्यांच्या बाळाच्या हत्ये प्रकरणी आईला अटक
  3. Child Murder : बापानेच केली चिमुकल्याची हत्या; घटनेने खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.