कर्नूल (आंध्र प्रदेश): आंध्र प्रदेशमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. त्यामागचे कारण म्हणजे हत्या झालेला तरुण हा आरोपीच्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करत होता. जानेवारीतील चाकूने करण्यात आलेल्या हत्याकांडात पोलिसांच्या तपासात हत्येचे कारण उघड झाले. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे तो आरोपीच्या मैत्रिणीला काही न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याच्या नावाने ब्लॅकमेल करत होता, असेही तपासातून उघड झाले आहे.
आरोपीच्या मोबाइलमध्येच होते 'न्यूड' व्हिडीओ: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नूल मंडळाच्या बालाजीनगर येथील एरुकली दिनेश पदवीचे शिक्षण घेत आहे. फुल डेकोरेटरचे काम करणाऱ्या मल्लेपोगु मुरलीकृष्ण (२२) याच्याशी त्याची मैत्री होती. रिपोर्टनुसार, दिनेशने त्याच्या प्रेयसीचे काही न्यूड व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. एके दिवशी मुरलीकृष्णाने गुपचूप ते व्हिडिओ त्याच्या फोनवर पाठवले. यानंतर त्याने मुलीला बोलावून तिचा विनयभंग सुरू केला. तो व्हिडीओ कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊ लागला. या छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कालव्यात फेकून दिला होता मृतदेह: या घटनेनंतर दिनेशच्या मनात मुरलीकृष्णच्या विरोधात राग येऊ लागला. त्याचा दुसरा मित्र किरण कुमारसोबत त्याने योजना आखली. 25 जानेवारी रोजी दिनेश आणि किरण कुमार मुरलीकृष्णला दुचाकीवरून शहराच्या बाहेरील पंचलिंगला येथे घेऊन गेले. जिथे मुरलीकृष्ण याची भोसकून हत्या करण्यात आली. त्यानंतर एक ऑटो भाड्याने घेण्यात आला आणि नन्नरु टोल प्लाझाजवळील एचएनएसएस कालव्यात मृतदेह टाकण्यात आला. त्यांनी मयताचे मोबाईल व कपडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
चौकशीतून उघड झाले हत्येचे रहस्य: जेव्हा मुरलीकृष्ण घरी परतला नाही तेव्हा त्याच्या पालकांनी शक्य त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला. याप्रकरणी 16 रोजी कुरनूल तालुका नागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी दिनेशची चौकशी केली असता संपूर्ण रहस्य उघड झाले. हांद्री-नीवा कालव्यातील मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत. हत्या केल्यानंतर पोलिसांना हत्याकांडाचा छडा लागू नये यासाठी आरोपींनी मोठा प्लॅन केला होता. त्यानुसार हत्या केल्यानंतर मृताचे कपडे आणि मोबाईलला आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते. त्यामुळे आरोपींनी एकप्रकारे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.