ETV Bharat / bharat

कृष्णजन्मभूमिही मुक्तीच्या मार्गावर? ज्ञानवापीनंतर मथुरेतील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला मंजुरी - शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Shahi Eidgah Mosque : अलाहाबाद उच्च न्यायालयानं कृष्णजन्मभूमी मंदिर संकुल प्रकरणात हिंदू पक्षाच्या याचिकेवर शाही इदगाह मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Shahi Eidgah Mosque
Shahi Eidgah Mosque
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 5:30 PM IST

प्रयागराज Shahi Eidgah Mosque : मथुरेतील शाही इदगाह संकुलाचं सर्वेक्षण होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळून लावलाय. कृष्णजन्मभूमी प्रकरणावर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयानं आमचा अर्ज स्वीकारला आहे. जिथं आम्ही शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण करण्याची मागणी आयुक्तांकडं केली होती. या प्रकरणाची 18 डिसेंबर रोजी रूपरेषा ठरवली जाईल. न्यायालयानं शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळला आहे. त्यामुळं हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे.

काय आहे हिंदू पक्षाचा दावा? : अलाहाबाद हायकोर्टानं गुरुवारी श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणी आदेश देताना सांगितलं की, याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, भगवान श्री कृष्णाचं जन्मस्थान मशिदीच्या खाली आहे. आधी मशीद हिंदू मंदिर होतं, अशी अनेक चिन्हे इथे आहेत. याशिवाय मशिदीच्या खाली कमळाच्या आकाराचा स्तंभ, हिंदू देवतांपैकी एक 'शेषनाग'ची प्रतिमा देखील आहे. इतकंच नाही, तर मशिदीच्या खांबांच्या खालच्या भागात हिंदूची धार्मिक चिन्हे, कोरीवकाम असल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत सर्वेक्षणाच्या पद्धतींवर चर्चा केली जाईल, असं न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे.

मशिदीच्या खाली काय आहे : रिकाम्या जागेवर मशीद बांधली आहे, की मंदिर पाडण्यात आलं. या सर्व प्रश्नांची उत्तरे एएसआयच्या सर्वेक्षणातून सहज सापडतील. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले, शाही इदगाह मशिदीमध्ये हिंदू मंदिराची अनेक चिन्हे आहेत. वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था (ASI ) याचं सर्वेक्षण करेल. त्यानंतर मशिदीच्या आत हिंदू देवी-देवताची चिन्हं आहेत, की नाही हे स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक
  2. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 : काँग्रेसच्या पाच खासदारांसह विरोधकांचे एकूण 15 खासदार निलंबित; डेरेक ओ ब्रायन यांचंही निलंबन
  3. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी निवडणूक आयोगानं सुधारलं पाहिजे - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.