ETV Bharat / bharat

'नीट' प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोटामध्ये आत्महत्या

Neet Student Suicide : 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानच्या कोटा येथे घडली आहे.

Suicide of a student preparing for 'NEET'
'नीट' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 8:19 AM IST

कोटा (राजस्थान) Neet Student Suicide : काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या कोटामध्ये 'नीट' परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी कोचिंग सेंटरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण ताजं असतानाच आता कोटाच्या कोचिंग सेंटरच्या अजून एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एक वर्षापासून राहायचा कोट्यात : फोरिद हुसैन असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. 20 वर्षीय फोरिद हा मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी होती. तसंच मागील वर्षभरापासून तो राजस्थानच्या कोटामध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. या प्रकरणी माहिती देत पोलिसांनी म्हंटलंय की, फोरिदचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस करण्यात येईल. तसंच याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर आत्महत्येमागील कारण सांगता येईल.

फोन करूनही खोलीचा दरवाजा उघडला नाही : दादाबाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश पाठक यांनी सांगितलं की, वक्फ नगर भागात राहत असलेल्या फोरिदला सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या वर्गमित्रांनी अखेरचं पाहिलं होतं. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचे मित्र रूमबाहेर आले. त्यांनी फोरिदला फोन केला. मात्र तरी देखील त्यानं दरवाजा उघडला नाही. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही फोरिदनं प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांना लगेचंच घरमालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर फोरिदच्या घरमालकानं जेव्हा त्याची खोली उघडली तेव्हा त्यांना फोरिदनं आत्महत्या केल्याचं आढळून आलं. त्यानंतर फोरिदला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. फोरिदचे कुटुंबीय आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल
  2. Students Write Wishes On Temple : कोटामधील नैराश्यग्रस्त विद्यार्थी 'या' मंदिराच्या भिंतीवर लिहितात नवस! वाचा स्पेशल स्टोरी
  3. Kota students suicide : कोटामध्ये लातूरसह बिहारच्या विद्यार्थ्याची तणावातून आत्महत्या, दोन महिने कोचिंगमधील परीक्षांवर बंदी लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.