ETV Bharat / bharat

सॉरी पापा, चुक झाली, आत्महत्या करतेय! हा व्हिडिओ करुन तरुणीने संपवलं आयुष्य - धनबाद आत्महत्या न्यूज

गुजरातच्या आयशा खानप्रमाणेच झारखंडमधील एका तरुणीने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करत आयुष्य संपवलं. आत्महत्येचे कारण तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आत्महत्येपूर्वीचा तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रांची
रांची
author img

By

Published : May 21, 2021, 7:09 PM IST

Updated : May 26, 2021, 1:14 PM IST

रांची - मला माफ करा, मी आत्महत्या करत आहे. माझ्या सासरच्यांकडे येऊन मी चूक केली, सॉरी पापा, मी तुमचे ऐकले नाही, हे शब्द आहेत झारखंडमधील 21 वर्षीय कोमल पटेल या तरुणीचे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून तिने गळफास घेत मृत्युला कवटाळलं. आत्महत्यापूर्वीचा कोमलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोमलला न्याय मिळावा अशी मागणी आता सोशल मीडियावरून होत आहे.

तरूणीचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ

'मला माफ करा मी आत्महत्या करत आहे. आता मला सहन होत नाही. सासरच्यांकडे येऊन मी चूक केली, सॉरी पापा, मी तुमचे ऐकले नाही. मला वाटले की माझा नवरा सुधारला आहे. परंतु तो सुधारला नसून त्याने मला मारहाण केली, शिवीगाळ केली. तुम्ही माझ्या मुलाची काळजी घ्या आणि माझ्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा द्या, मला न्याय द्या नाहीतर मला मुक्ती नाही मिळणार, मला माफ करा, ही हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे कोमलने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

komal-suicide-video-in-dhanbad
कोमल आणि तीचा पती अलोक

कोमल पटेल हिचे लग्न झारखंडच्या धनसारमधील रेल्वे कर्मचारी अलोक कुमार प्रसादसोबत झाले होते. अलोक कोमलला मारहाण करायचा तसेच शिवीगाळ करायचा. या त्रासाला कंटाळून कोमलने आत्महत्या केली. कोमलला एक लहान मुलगा आहे. घटनेनंतर कोमलचे वडिल उमेश प्रसाद यांनी अलोक कुमार प्रसाद आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर अलोक कुमार कुटुंबीयांसोबत फरार झाला. हुंड्यासाठी सासरची मंडळी छळ करत होती, असा आरोप कोमलच्या वडिलांनी केला आहे.

अहमदाबादच्या आयशा खानने आत्महत्येपूर्वी केला होता व्हिडिओ -

गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती नदीत एका 23 वर्षीय विवाहितेने उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओमध्ये तिने हसत-हसत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Last Updated : May 26, 2021, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.