नवी दिल्ली - आज आरटीजीएसची सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार आहे. मुंबईत मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. अशा महत्त्वाच्या घटनांवर संक्षिप्त नजर टाकू या.
१. पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलली
सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करुन केंद्राने वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलली आहे. नियोजित वेळेप्रमाणे ही परीक्षा येत्या 18 एप्रिलला होणार होती. कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचा मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) मोठा निर्णय घेतला आहे.
२. १८ एप्रिल रात्री १२ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत आरटीएस सेवा बंद
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन काळात आरटीजीएसचे तांत्रिक अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजल्यापर्यंत आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे.
३. कर्नाटकमध्ये सर्वपक्षीय बैठक
गेल्या २४ तासांमध्ये कर्नाटकमध्ये कोरोनाचे ११ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये कोरोनाच्या सद्यस्थितीचा आज आढावा घेतला जाणार आहे. तसेच सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
४. भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बंद राहण्याचा शेवटचा दिवस
भोसे ग्रामस्तरीय समितीने १४ ते १८ एप्रिलपर्यंत सलग पाच दिवस भोसे येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. आज बाजारपेठ बंद राहण्याचा शेवटचा दिवस आहे. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही वाढला होता. त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
५. रात बाकी है वेबसीरीज स्ट्रीम होणार
अनुप सोनी, पाओली डॅम आणि राहुल देव यांची भूमिका असलेला 'रात बाकी है' ही वेब सीरिज १८ एप्रिलला स्ट्रीम होणार आहे.
६. त्र्यंबकेश्वर बंद राहण्याचा शेवटचा दिवस-पुढील निर्णय लवकरच-
नाशिकमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर १८ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला होता. ५ ते १८ एप्रिलपर्यंत भाविकांसाठी मंदिर करण्यात आलेले आहे. तथापि देवाच्या पारंपरिक तिन्ही त्रिकाल पूजा नैवेद्य चालूच आहेत. यात खंड पडणार नाही. याबाबत मंदिर खुले किंवा बंद ठेवण्याबाबत पुढील निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
७. जागतिक वारसा दिन
१८ एप्रिलला जगभर जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. जागतिक वारसास्थळांची नियमावली युनेस्कोद्वारे तयार केली जाते. ज्या स्थळाचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करायचा आहे, त्याचे आधी नामांकन मिळवावे लागते. ही नामांकनाची नश्ती भारत सरकार युनेस्कोकडे पाठविते. राज्य सरकार अशी नश्ती तयार करून केंद्र शासनाला सादर करू शकते. राज्यातील सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसामधील समावेशाची प्रतिक्षा आहे.
८. मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर रविवारी (१८ एप्रिल) देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी पायाभूत सुविधा व देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
९. आम आदमीचा उत्तराखंडमध्ये पक्ष विस्तार-
आम आदमी पार्टी उत्तराखंडमध्ये कर्नल (सेवानिवृत्त) अजय कोठियाल आज प्रवेश करणार आहेत. कर्नल अजय कोठियाल यांची अनेक दिवसांपासून आपबरोबर चर्चा सुरू होती.
१०. अहमदाबादवासियांसाठी स्पेशल रेल्वे
अहमदाबाद समस्तीपूर व मुंबई समस्तीपूर स्पेशल रेल्वे आजपासून सुरू करण्यात येत आहे.