मुंबई : क्रिप्टोकरन्सीला म्हणजे आभासी चलन होय. क्रिप्टोकरन्सी हे एक स्वतंत्र चलन आहे व त्याचा कोणीही मालक नाहीय. क्रिप्टोकरन्सी हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. पहिले बिटकॉइन २००९ मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू (Cryptocurrency Prices Today) शकतो.
भारतात क्रिप्टोकरन्सी : व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिली (Bitcoin Rate Today) आहे. एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे. आणि इतकेच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे, असे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचे म्हणणे होते. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला (Cryptocurrency Prices Today in India) केला.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 14,17,634 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,04,953 रूपये आहे. बायनान्सची किंमत 22,773 रूपये (Cryptocurrency Prices 13 December 2022) आहे.