हैदराबाद - थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांचे गणित क्षेत्रातील थोर कार्याची आठवण म्हणून 'राष्ट्रीय गणित दिन' ( National Mathematics Day ) म्हणून साजरा केला जातो.
थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांनी गणित विश्लेषण, अनंत श्रेणी, घातांक यामध्ये अमूल्य असे योगदान दिले.
राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व जाणून घेऊ- ( National Mathematics Day Significance )
राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागे लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश आहे. तसेच मानवतेच्या दृष्टीने गणिताचे महत्त्व कळणे आहे. तरुणांमध्ये गणिताबद्दल प्रोत्साहन, जनजागृती आणि सकारात्मक निर्माण करणे हा उद्देश आहे. या दिवशी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक शिबीर व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात विकास, उत्पादन, शिक्षकांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
श्रीनिवास रामानुजन कोण होते, त्यांनी गणितात कोणते महत्त्वपूर्ण काम ( Srinivasa Ramanujan work in mathematics ) केले?
- १२ वर्षांच्या वयामध्ये औपचारिक शिक्षण न घेताही त्यांनी त्रिकोणमितीमध्ये बुद्धिमत्ता दाखवून दिली. त्यांनी अनेक प्रमेय विकसित केले आहेत.
- १९०४ मध्ये माध्यमिक विद्यालय समाप्त केल्यानंतर त्यांना कुंभकोणमध्ये शिष्यवृत्ती मिळणार होती. मात्र, गणितात वगळता इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही.
- १४ वर्षे वय असताना रामानुजन हे घरातून पळून गेले. त्यांनी मद्रामधील पचैयप्पा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना केवळ गणितामध्ये चांगले गुण मिळत होते. त्यामुळे त्यांना कला शाखेची पदवी मिळू शकली नाही. आर्थिक परिस्थिती गरीब असतानाही त्यांचे गणितामध्ये संशोधन सुरू होते.
- १९१२ मध्ये इंडियन मॅथिटिकल सोसायटीचे संस्थापक रामास्वामी अय्यर यांनी मदत केली. त्यामुळे रामानुजन यांना मद्रास पोर्टमध्ये क्लार्कची नोकरी मिळू शकली.
- रामानुजन यांनी ब्रिटिश गणितज्ज्ञांना आपले संशोधन पाठविणे सुरू ठेवले. त्यांना १९१३ मध्ये यश मिळाले. केंब्रीज विद्यापीठातील जी. एच. हार्डी यांनी त्यांना लंडनमध्ये शिकण्यासाठी बोलावून घेतले.
- १९१४ मध्ये रामानुजन ब्रिटनमध्ये पोहोचले. हार्डी यांनी त्यांना ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश दिला. १९१७ मध्ये रामानुजन यांची लंडनमधील मॅथमॅटिकल सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाली.
- १९१८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाले. असे यश मिळणारे रामानुजन हे सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले. इंग्लंडमधील यशानंतर रामानुजन हे १९१९ मध्ये भारतात परतले. रामानुजन यांची प्रकृती बिघडली. १९२० मध्ये केवळ वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा-India Bans You Tube Channels : केंद्र सरकारकडून 20 यूट्यूब चॅनल्सवर बंदी, फेक माहिती पसरवण्याचा आरोप
रामानुजन यांचे गणितामधील योगदान
- रामानुजन यांची गणितामधील प्रतिभा ही १८ व्या शतकातील यूलर आणि १९ व्या शतकामधील जॅकोबीप्रमाणे मानली जाते. त्यांनी रीमॅन सीरीज, इलिप्टिक इंटीग्रिल, हायपरजोमॅट्रिक सीरीज आणि जीटा फंक्शनमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर तीन वह्या आणि अनेक पानांवर गणिततज्ज्ञांनी काम केले.
- २०१५ मध्ये रामानुजन यांच्यावर द मॅन हू न्यू इन्फिनिटी ( The Man Who Knew Infinity ) हा बायोपिक बनविण्यात आला. त्यामध्ये देव पटेल यांना रामानुजन यांनी भूमिका केली. मॅथ्यु ब्राऊन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले.
रामानुजन यांच्याबाबत रंजक माहिती
- रामानुजन हे १३ वर्षांचे असताना कोणाच्याही मदतीशिवाय त्रिकोणमितीचा अभ्यास करू शकत होते.
- रामानुजन यांना शाळेत कोणीही मित्र नव्हते. कारण, त्यांना शाळेतील मित्र कधीही समजू शकत नव्हते. रामानुजन यांच्या गणिती कौशल्यामुळे त्यांच्या मित्रांना आश्चर्य वाटायचे.
- त्यांना गणिताशिवाय इतर विषयांत यश मिळाले नाही. त्यामुळे रामानुजन यांना पदवी मिळू शकली नाही.
- कागद महाग असल्याने रामानुजन गणिताचे उत्तरे आणि इतर माहिती पाटीवर लिहित असायचे.
- ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय होते.
- १९०९ मध्ये रामानुजन यांचा विवाह झाला. तेव्हा त्यांचे वय १२ वर्षे आणि पत्नीचे वय १० वर्षे होते.
- रॉयल सोसायटीमध्ये फेलोशिप मिळविणारे ते दुसरे भारतीय होते.
- त्यांच्या स्मृतीची आठवण म्हणून चेन्नईमध्ये संग्रहालय आहे.