ETV Bharat / bharat

Chakradhar Swami 2022 थोर समाजसुधारक तत्त्वज्ञ चक्रधर स्वामींविषयी थोडक्यात जाणून घ्या - ईश्वरांच्या पाचवा अवतार

महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार चक्रधर स्वामी यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार Ishwaranchaya fifth incarnation मानले जाते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक First known social reformer होते. चक्रधर स्वामींच्या Chakradhar Swami कार्याचा थोडक्या आढावा पाहूयात.

Chakradhar Swami
चक्रधर स्वामी
author img

By

Published : Aug 20, 2022, 5:29 PM IST

महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार Ishwaranchaya fifth incarnation मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक First known social reformer होते. चक्रधर स्वामींच्या Chakradhar Swami कार्याचा थोडक्या आढावा पाहूयात.

बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात चक्रधर स्वामी यांचा जन्म चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधीची Chakradhar Swami Early Life माहिती लीळाचरित्राच्या या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे पाळण्यातील नाव हरपाळदेव असे होते.युवा झाल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद जडला. ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. महानुभावीयांच्या पंच अवतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक मतप्रवाह आहे.

समाज व धर्म सुधारणा भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. सिंहस्थ यात्रेनिमित्ताने ते त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले. एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली, असे सांगितले जाते.

लोकसेवेसाठी सर्वस्वाचा केला त्याग यानंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. राजविलासी भोग, संसार सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे, अशी सबब घरी सांगितली. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील गोविंदप्रभू दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर असे नाव दिले.गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या येळी या गावात चक्रधरस्वामींनी काही काळ घालवला. येळी येथे महानुभाव पंथीय मंदीर आहे. पुढे महाराष्ट्रभर एकट्यानेच त्यांनी भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही ते फिरले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले. त्यापैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा असा शिष्यपरिवार मिळाला.

श्री चक्रधर स्वामींची शिकवण प्राणिमात्रांवर दया करावी, कोणत्याही जिवाला त्रास देऊ नये. कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये, अशी त्यांची शिकवण त्यांची होती. एकदा काय झाले. रानात दोन शिकाऱ्यांमध्ये शर्यत लागली. मग त्यांनी झुडपातून एक ससा उठवला. ससा घावरून जोरात पळू लागला. श्रीचक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली शांत बसले होते. घाबरलेला ससा चक्रधर स्वामींच्या मांडीखाली जाऊन बसला. श्रीचक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरवाळले. इतक्यात कुत्री आणि शिकारी श्रीचक्रधर स्वामींजवळ पोचला. शिकाऱ्यांनी चक्रधर स्वामींना ससा देण्याची विनंती केली.जी जी ससा सोडावा. शिकारी म्हणाले, स्वामी, हा आमच्या शर्यतीतला ससा आहे, तो आम्हांला द्यावा शरण आलेल्या कोणत्याही जिवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, ओढया नदीचे पाणी पितो. त्याला झुडपातून का उठवले त्याने तुमचे काय बिघडविले विनाकारण का मारता तुम्ही त्याला श्रीचक्रधर स्वामी म्हणाले. श्रीचक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकाऱ्यांनी विचार केला. त्यांना स्वामींचे म्हणणे मनोमन पटले. त्यांना वंदन करत ते म्हणाले, खरे आहे महाराज तुमचे. आता आम्ही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही. असे म्हणून शिकारी निघून गेले. श्रीचक्रधर स्वामींना आनंद झाला. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागले. त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि ते सशाकडे पाहून म्हणाले, पळा आता मग सशाने धूम ठोकली.

हेही वाचा Hartalika Teej 2022 हरितालिका तीजचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.