ETV Bharat / bharat

KARGIL VIJAY DIWAS पाकिस्तानी घुसखोरीचा भारताने असा केला होता पर्दाफाश - kargil vijay diwas

आजपासून बरोबर २२ वर्षांपूर्वी मे ते जुलै १९९९ दरम्यान पाकिस्तानने नियंत्रण रेषा पार करून कारगिलच्या उंच प्रदेशात भारतीय चौक्या ताब्यात घेण्याचा अगोचरपणा केला होता, जेथून भारतीय सैन्यावर निशाणा साधणे सोपे होते. कारगिल युद्ध जिंकण्यासाठी या शिखरावरील चौक्या पुन्हा आपल्या ताब्यात घेणे आवश्यक होते. पाकिस्तानने या घुसखोरीची सुरूवात १९९८ मध्येच केली होती. पाकिस्तानने भारतीय क्षेत्रात कशी घुसखोरी केली आणि कशा प्रकारे त्याच्या या घुसखोरीचा पर्दाफाश झाला, हे आता जाणून घेऊया..

KARGIL VIJAY DIWAS
KARGIL VIJAY DIWAS
author img

By

Published : Jul 26, 2021, 4:15 AM IST

हैदराबाद - पाकिस्तानी सैनिकांनी वर्ष १९९९ मध्ये कारगिलमध्ये नियंत्रण रेष पार करून भारताच्या भूभागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरूवातीपासूनच पाकिस्ताना कारगिलवर त्याला ताबा मिळवायचा आहे, हे मान्य करण्यास तयार नव्हता. दूरध्वनीवरील एक संभाषण आणि काही दस्तऐवजांनी पाकिस्तानचा हा खोटारडेपणा जगासमोर आणला. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याची योजना पाकिस्तानने लाहोर शिखर परिषदेच्या अगोदर नोव्हेंबर १९९८ मध्येच तयार केली होती.

ऑगस्ट-सप्टेंबर १९९८ मध्ये सियाचिन मुद्यावरील वादामुळे भारत पाकिस्तान संवाद संपला होता. त्यानंतर ऑक्टोबर १९९८ मध्ये तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी मुशर्रफ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

पाकिस्तानने ताबा मिळवलेले क्षेत्र आणि चौक्या..

कारगिल युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी उंचावरील शिखरांवर ताबा मिळवला होता. पाकिस्तानी सैनिकांनी जोजिला आणि लेह या दरम्यान मुश्कोह, द्रास, कारगिल, बटालिक आणि तुर्तुक उपविभागांमध्ये घुसखोरी केली. सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि भारतीय भागात ४ ते १० किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. पाकिस्तानी सैनिकांनी १३० चौक्यांवर ताबा मिळवला होता.

हेही वाचा-कारगिल युद्धातील परमवीर चक्र प्राप्त शूर सैनिकांची थरारक कहाणी

घुसखोरीचा कट..

पाकिस्तानचा घुसखोरीचा कट भारतीय सैन्यासाठी आश्चर्यकारक होता. या योजनेंतर्गत पाकिस्तानने सर्वप्रथम द्रास आणि मुश्कोह खोरे तसेच बटालिक-यलदोर-चोरबतला क्षेत्र आणि तुर्तुकमध्ये घुसखोरी केली. द्रास आणि मुश्कोह खोरे एलओसीच्या सर्वात जवळ होते आणि पाकिस्तानी सैनिकांनी या क्षेत्रातील उंचीचा फायदा घेत या भागातील चौक्यांवर ताबा मिळवला होता.

हेही वाचा-KARGIL VIJAY DIWAS जाणून घ्या, ऑपरेशन विजयमधील वीर जवानांची शौर्यगाथा

पाकिस्तानने कश्मिर खोरे, किश्तवाड-भद्रवाह आणि हिमाचलप्रदेशातील शेजारी भागांमध्ये घुसखोरी करण्याच्या उद्देष्याने मस्कोह चौकीवर ताबा प्रस्थापित केला होता. तर, बटालिक-यलदोर क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने सिंधु नदीच्या उंचावरील भूभागांमध्ये ताबा मिळवला होता.

हेही वाचा-पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू, तर 64 जण अद्यापही बेपत्ता

चोरबतला आणि तुर्तुक या क्षेत्रात यासाठी पाकिस्तानने कब्जा केला ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर कब्जा केला जाऊ शकेल आणि येथील लोकांना दहशतवादाकडे ओढता येईल. या महत्वपूर्ण चौक्यांवर ताबा मिळवल्यानंतर मश्कोह-काकसर क्षेत्रांमध्ये केलेल्या घुसखोरीला अंतिम स्वरूप देण्यात येणार होते आणि त्यामुळे श्रीनगर-लेहला जोडणारा राजमार्ग बंद करता आला असता.

सैनिकांची तैनाती..

सैनिकांची किमान संख्या निश्चित करण्यासाठी सुरूवातीची घुसखोरी कमांड उत्तर क्षेत्राच्या एफसीएनएच्या सैनिकांनी केली होती. उत्तर लाईट इन्फंट्रीच्या सैनिक मारले गेल्यावर इतर तुकड्यांच्या सैनिकांना घुसखोरी केलेल्या क्षेत्रात तैनात केले गेले.

तोफांची निर्मिती ही स्वस्त आणि सहज करण्यासारखे काम असल्याने, पाकिस्तानक़े नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी तोफा आणि हत्यारे बनवण्यासाठी खूप वेळ होता. त्याचवेळी, वेळोवेळी शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्यासाठीही वेळ होता. याचबरोबर, रेडिओ आणि तारांद्वारे संपर्काचा उपयोगही केला गेला.

तरीही, जेव्हा पाकिस्तानी सैनिक या माध्यमांच्या द्वारे संभाषण करत असत, तेव्हा भारतीय सैनिक त्यांचे संभाषण पकडत असत. परंतु पाकिस्तानी सैनिक वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असल्याने भारतीय सैनिक त्यांच्यातील चर्चा समजू शकत नव्हते.

घुसखोरीत सामिल असलेल्या तुकड्या..

द्रास-मश्कोह क्षेत्रात घुसखोरीसाठी ५ एनएलआय तुकड्या नियुक्त केल्या गेल्या होत्या आणि पाकिस्तानी बाजूने नियंत्रण रेषेपासून एक रस्ता खुला केल्यावर आघाडीवरील तुकडी तैनात करण्यात आली होती. या घुसखोरीला जिहादी स्वरूप देण्यासाठी, या तुकड्यांना पुरेशा प्रमाणात वाढवण्यात आले आणि वेगवेगळ्या संघटनांच्या दहशतवाद्यांचा समूह तयार करण्यात आला. याबरोबरच, साध्या लोकांसारखे जसे की कुली किंवा हमालांच्या रूपात तैनात करण्यात आले होते.

या युद्धात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे, रॉकेट, तोफगोळे, मशिनगन आणि बाँम्बचा उपयोग करण्यात आला. अतिरिक्त सैन्य तैनात करण्यासाठी आणि वेळेवर शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी पाकिस्तानी सैनिक हेलिकॉप्टर्सचा उपयोग करत असत. या दरम्यान पाकिस्तानी युनिट्सनी मोठ्या प्रमाणावर विशेष समर्थन दिले होते आणि विशेष सेवा गटही ही कारवाई पार पाडण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

जवळपास दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने २६ जुलै १९९९ रोजी विजयश्री मिळवली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.