साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दसरा (Dussehra 2022) या सणाचे महत्व आहे. या निमित्ताने सगळीकडे नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. सोन्या-चांदीच्या खरेदीत गुंतवणूक म्हणून अनेक ग्राहक नाणी (कॉईन्स) खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र बुधवारी सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) वधारले होते. आंतररारष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतोय. बुधवारी सोन्याचे फ्युचर्स दर 0.60 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,800 रूपयांवर आला होता. तर, एक किलो चांदीचा दर 61,790 रुपये इतका होता.
बुधवारी शहरातील सोन्या-चांदीचे दर :
- शहर सोने 1 किलो चांदीचा दर
- मुंबई 47,483 61,790
- पुणे 47,483 61,790
- नाशिक 47,483 61,790
- नागपूर 47,483 61,790
- दिल्ली 47,401 61,680
- कोलकाता 47,419 61,710